"भारत तपासात सहकार्य करत नाही"; कॅनडासोबतच्या वादावर अमेरिकेचं मोठं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 09:42 AM2024-10-16T09:42:06+5:302024-10-16T09:42:36+5:30

भारत आणि कॅनडाच्या वादात आता अमेरिकेनेही उडी घेतली आहे.

India Canada dispute America said India is not cooperatin in nijjar murder case | "भारत तपासात सहकार्य करत नाही"; कॅनडासोबतच्या वादावर अमेरिकेचं मोठं वक्तव्य

"भारत तपासात सहकार्य करत नाही"; कॅनडासोबतच्या वादावर अमेरिकेचं मोठं वक्तव्य

India VS  Canada : खलिस्तान समर्थक हरदीपसिंग निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडामध्ये तणाव वाढत आहे. निज्जरच्या हत्या प्रकरणावरून भारत आणि कॅनडा यांच्यातील वादात आता अमेरिकेनेही उडी घेतली आहे. एकप्रकारे याद्वारे भारतावर अप्रत्यक्ष दबाव असल्याचा प्रयत्न केला जात असल्याचे म्हटलं जात आहे. निज्जरच्या हत्या प्रकरणात भारत तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. कॅनडाचे आरोप अत्यंत गंभीर असून भारताने तपासात सहकार्य करावे, असं अमेरिकेने म्हटलं आहे. या विधानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची राजनैतिक आव्हाने आणखी वाढली आहेत. कॅनडाचे समर्थन करून अमेरिका भारतावर अप्रत्यक्षपणे त्यांच्या अटी मान्य करण्यासाठी दबाव आणत आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी सोमवारी दावा निज्जरच्या हत्येत भारत सरकारचे अधिकारी सामील आहेत, असा दावा केला होता. त्यानंतर भारत आणि कॅनडामधील तणावावर अमेरिकेने भाष्य केले. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कॅनडाचे पंतप्रधान ट्रुडो यांनी संसदेत निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केला होता. त्यानंतरही अमेरिकेने भारताला तपासात सहकार्य करण्यास सांगितले होते. आता पुन्हा एकदा भारत तपासात सहकार्य करत नसल्याचा आरोप केला केला आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी पत्रकार परिषदेत भारतावर आरोप केले आहेत. कॅनडाचे आरोप गंभीर आहेत आणि त्याला हलक्यात घेऊ नये, असे मॅथ्यू मिलर यांनी म्हटलं आहे. भारतावर लावण्यात आलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. कॅनडासह भारत सरकारने तपासात मदत करावी अशी आमची इच्छा आहे. भारताने आजपर्यंत हे केले नाही, असे मिलर यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं. मिलर यांनी भारताला तपासात सहकार्य करण्याचा सल्ला दिला. मिलर यांनी दिलेला हा सल्ला भारताने नाकारला असून स्वत:च्या मार्गाने जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

खपवून घेतले जाणार नाही - पंतप्रधान जस्टिन ट्रूडो 

"कॅनडा-भारत संबंधांना मोठा इतिहास आहे, पण आता जे घडत आहे ते सहन करता येणार नाही. मी गेल्या आठवड्यात पंतप्रधान मोदींशी बोललो. सिंगापूरमध्ये आमच्यामधील बैठक किती महत्त्वाची असेल हे त्यांना सांगितले. भारत सरकारचा चुकून असा विश्वास होता की ते कॅनडाच्या भूमीवर आपल्या लोकांविरुद्ध गुन्हेगारी कारवाया करू शकतात. हे खपवून घेतले जाणार नाही," असं पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी म्हटलं होतं.
 

Web Title: India Canada dispute America said India is not cooperatin in nijjar murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.