कॅनडातील 'तो' शीख कोण आहे, ज्याला खूश करण्यासाठी जस्टिन ट्रूडोंनी थेट भारताशी पंगा घेतला?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 04:32 PM2024-10-16T16:32:14+5:302024-10-16T16:32:24+5:30

India-Canada Relations : गेल्या काही काळापासून भारत आणि कॅनडातील संबंध बिघडले आहेत.

India-Canada Relations : Who is 'that' Sikh in Canada, for whom Justin Trudeau has gone against india | कॅनडातील 'तो' शीख कोण आहे, ज्याला खूश करण्यासाठी जस्टिन ट्रूडोंनी थेट भारताशी पंगा घेतला?

कॅनडातील 'तो' शीख कोण आहे, ज्याला खूश करण्यासाठी जस्टिन ट्रूडोंनी थेट भारताशी पंगा घेतला?


India-Canada Relations : खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडामधील संबंध बिघडले आहेत. गेल्या रविवारी कॅनडाने या प्रकरणात भारतीय उच्चायुक्तांना ‘पर्सन ऑफ इंट्रस्ट’ म्हटले होते. त्यानंतर भारत सरकारने आपल्या 6 उच्चायुक्तांना परत बोलावण्याचा निर्णय घेतला. हे सर्व अधिकारी शनिवारपर्यंत भारतात पोहोचतील.

दरम्यान, या संपूर्ण वादावर भारताने कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. भारताने ट्रुडो यांच्या आरोपांचे वर्णन राजकीयदृष्ट्या प्रेरित आणि व्होट बँकेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. असे मानले जाते की, जस्टिन ट्रूडो खलिस्तान समर्थक व्होट बँक आणि एनडीपीच्या समर्थनासाठी भारतविरोधी अजेंडा चालवत आहेत.

कॅनडात ट्रूडो सरकार बॅकफूटवर!
पुढील वर्षी कॅनडात निवडणुका होणार आहेत, पण सध्या जस्टिन ट्रूडो यांचे सरकार अनेक मुद्द्यांवर बॅकफूटवर आले आहे. कॅनडातील खलिस्तान समर्थक एनडीपीचे नेते जगमीत सिंगने नुकताच ट्रुडो सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. त्यानंतर ट्रुडो सरकार अल्पमतात आले. कॅनडाच्या संसदेत ट्रुडो सरकारविरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फसला असला तरी आगामी निवडणुका ट्रूडोसाठी कठीण ठरू शकतात.

अशातच, कॅनडाचे पंतप्रधान ट्रूडो यांना एनडीपी नेते जगमीत सिंगचा पाठिंबा मिळेल, अशी त्यांना आशा आहे. असे मानले जाते की, आपले राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी ट्रूडो जगमीत सिंग यांच्या राजकीय विचारसरणीचा वापर करत आहेत. एनडीपीचा असा विश्वास आहे की, कॅनेडियन हिंदू, शीख आणि मुस्लिमांच्या विरोधात आहेत. त्यामुळेच जगमीत सिंग नेहमी कॅनेडियन हिंदूंना टार्गेट करतात. 

कोण आहे जगमीत सिंग?
जगमीत सिंग हा कॅनडातील न्यू डेमोक्रॅटिक पक्षाचा (NDP) नेता आहे. त्याच्या पक्षाने 5 सप्टेंबर रोजी ट्रूडो सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केली होती. त्याने ट्रूडो सरकारवर टीका करताना ट्रूडोंना कमकुवत आणि स्वार्थी म्हटले होते. त्यांचा पक्ष 2021 पासून ट्रुडो सरकारला पाठिंबा देत होता. जगमीत सिंगचा जन्म पंजाबच्या बरनाला जिल्ह्यात झाला होता, परंतु त्यांचे कुटुंब 1993 मध्ये कॅनडामध्ये गेले. तो खलिस्तान चळवळीचा समर्थक असून, त्याने अनेकवेळा भारतविरोधी वक्तव्येही केली आहेत. जगमीत सिंगने आपल्या ताज्या वक्तव्यात भारतावर कठोर निर्बंध लादण्याची मागणी केली आहे. याशिवाय, त्याने निज्जर हत्याकांडासाठी मोदी सरकारला जबाबदार धरले आहे.

ट्रुडोंच्या भारतविरोधी अजेंड्यामागे हेच कारण?
कॅनडातील 2021 च्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. NDP 24 जागा जिंकून किंगमेकरच्या भूमिकेत होता. ट्रूडोचा लिबरल पक्ष बहुमताच्या आकड्यापासून 14 जागा दूर होता. अशा परिस्थितीत एनडीपीने सरकारला पाठिंबा देण्याची घोषणा केली. आता पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत खलिस्तान समर्थक व्होट बँक आणि पक्षांना आकर्षित करण्यासाठी जस्टिन ट्रूडो भारतविरोधी अजेंडा चालवत असल्याचे मानले जात आहे. 

Web Title: India-Canada Relations : Who is 'that' Sikh in Canada, for whom Justin Trudeau has gone against india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.