भारत-चीन सीमेवर एलियन?
By admin | Published: January 5, 2017 02:45 AM2017-01-05T02:45:19+5:302017-01-05T02:45:19+5:30
भारत व चीन यांच्यातील सीमा अन्य एका कारणास्तव चर्चेत आली आहे. ‘कोंगका ला पास’ या भागात यूएफओ (हवाई उड्डाण करणारी अज्ञात वस्तू) दिसल्याचे अनेकदा सांगण्यात आले आहे
इटानगर : भारत व चीन यांच्यातील सीमा अन्य एका कारणास्तव चर्चेत आली आहे. ‘कोंगका ला पास’ या भागात यूएफओ (हवाई उड्डाण करणारी अज्ञात वस्तू) दिसल्याचे अनेकदा सांगण्यात आले आहे. भारत व चीनला याची माहिती आहे. एलियनबाबत उत्सुकताही खूप आहे. १९६२ मध्ये याच भागात भारत आणि चीन युद्ध झाले होते. २००४ मध्ये हिमाचलप्रदेशात भूवैज्ञानिकांनी डॉ. अनिल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली पाहणी केली होती. तेव्हा त्यांना येथे हवेत अज्ञात वस्तू दिसल्याचे सांगितले जाते. चार फुटांची रोबोटसारखी ही प्रतिमा एका डोंगरामागे गडप झाली. आॅक्टोबर २०१२ मध्ये इंडो - तिबेट बॉर्डरवर पोलीस व भारतीय सैनिकांना लडाख भागात अशीच अज्ञात वस्तू दिसली होती. सप्टेंबर २०१२ मध्ये भारत - चीन सीमेवर भारतीय सैनिकांना १६० किमी लांब रिबीनच्या आकाराची वस्तू दिसली होती. कोणी या घटनांना तार्किक म्हणते तर कोणी याला अतिशयोक्ती. पण, या घटना वारंवार घडतात, ही मात्र वस्तुस्थिती आहे.