लडाखमध्ये ड्रॅगनची पाकिस्तानी चाल, एक वर्षापासून सुरू होती तयारी! सीमेवर जमवले एवढे सैन्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2020 06:11 PM2020-06-08T18:11:20+5:302020-06-08T18:21:29+5:30

सॅटेलाइट ने घेतलेल्या छायाचित्रांतून खुलासा झाला आहे, की  चीनने Ngari Gunsa एयरबेसवर लढाऊ विमानांचे ऑपरेटिंग वाढवले आहे. एवढेच नाही, तर येथे काही दिवसांपूर्वीच ट्रान्सपोर्ट विमानांचे लँडिंगदेखील वाढले आहे.

india china face off china pla was preparing like kargil incursion in ladakh from a year | लडाखमध्ये ड्रॅगनची पाकिस्तानी चाल, एक वर्षापासून सुरू होती तयारी! सीमेवर जमवले एवढे सैन्य

लडाखमध्ये ड्रॅगनची पाकिस्तानी चाल, एक वर्षापासून सुरू होती तयारी! सीमेवर जमवले एवढे सैन्य

googlenewsNext
ठळक मुद्देचीनने गेल्या वर्षाच्या मध्यातच पेंगाँग शो सरोवरापासून 100 किलोमीटर अग्नेय दिशेला आपल्या मोर्चेबांधनीचा वेग वाढवला होता.चीनने पेगाँग शो सरोवरापासून केवळ 180 किलोमीटर अंतरावरच मोठे विमानतळही तयार केले आहे.सॅटेलाइट ने घेतलेल्या छायाचित्रांतून खुलासा झाला आहे, की  चीनने Ngari Gunsa एयरबेसवर लढाऊ विमानांचे ऑपरेटिंग वाढवले आहे.

पेइचिंग :लडाखमधीलभारतीय सैन्याची जोरदार तयारी पाहून गडबडलेल्या चीनी ड्रॅगनने जवळपास एक वर्षांपासूनच, ज्या प्रमाणे पाकिस्तानने 'कारगिल'मध्ये घुसखोरी केली होती, त्याच प्रमाणे घुसखोरी करण्याची तयारी सुरू केली होती.  सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीतच सॅटेलाइटने मिळालेल्या फोटोतून खुलासा झाला आहे, की चीनने गेल्या वर्षाच्या मध्यातच पेंगाँग शो सरोवरापासून 100 किलोमीटर अग्नेय दिशेला आपल्या मोर्चेबांधनीचा वेग वाढवला होता. या अनुशंगानेच सैन्‍य तळांच्या आधुनिकीकरणाचे कामही सुरू करण्यात आले होते. यानंतर कोरोना महासंकटात भारत अडकलेला पाहून चीनने भारताच्या सीमेत घुसखोरी केली.

जोरदार प्रत्युत्तर; भारतानं चीनच्या दिशेनं वळवली बोफोर्सची तोंडं, ड्रॅगनच्या नाकाखालून उडणार लढाऊ विमान

याशिवाय चीनने मोठ्या प्रमाणावर सैन्‍य आणि शस्त्रसाठाही जमवला आहे. एवढेच नाही, तर चीनने पेगाँग शो सरोवरापासून केवळ 180 किलोमीटर अंतरावरच मोठे विमानतळही तयार केले आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर सैन्‍यासाठी आवश्यक असलेली वाहनेही जमवली आहेत. जेणे करून वेगाने सैन्य भारतीय सीमेपर्यंत पाठवता यावे. याच एअरबेसवर चीन, जे-11 आणि जे 16-एस विमानेही ऑपरेट करत आहे. हे ताजे फोटो ओपन सोर्स इंटेलिजन्स अॅनलिस्ट Detresfaने जारी केले आहेत.

केवळ सीमाच नव्हे, 'ही'देखील आहेत भारत-चीन वादाची 8 मुख्य कारणं

मालवाहू विमानांची उड्डाणं वाढली -
सॅटेलाइट ने घेतलेल्या छायाचित्रांतून खुलासा झाला आहे, की  चीनने Ngari Gunsa एयरबेसवर लढाऊ विमानांचे ऑपरेटिंग वाढवले आहे. एवढेच नाही, तर येथे काही दिवसांपूर्वीच ट्रान्सपोर्ट विमानांचे लँडिंगदेखील वाढले आहे. लडाखजवळील हा एअरबेस भारताच्या दौलत बेग ओल्‍डी येथील धावपट्टीपासून काही अंतरावरच आहे.

Corona Vaccine Update: या भारतीय कंपनीमध्ये तयार होतेय कोरोनाची 'सर्वात अ‍ॅडव्हान्स्ड' व्हॅक्‍सीन

कोरोनामुळे भारतीय जवानांनी रोखला होता सराव -
मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात एका जवानाला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी एकत्रीत येऊ नेय असा आदेश देण्यात आला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यात लडाखमध्ये केल्या जाणाऱ्या सैन्य सरावाचाही समावेश होता. 

CoronaVirus News: आश्चर्य! कोरोना व्हायरस अँटीबॉडीजसह बाळाचा जन्म, डॉक्टर हैराण; रुग्णालय म्हणते...

चीनचा 1962 प्रमाणेच धोका -
चीननेही सैन्य सराव थांबवला होता. मात्र, त्यांनी धोका देत गलवान खोऱ्यात आणि पेंगाँग शो सरोवराजवळील फिंगर्स भागात सैन्य तैनात केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गलवानमध्ये चीनचे 3,400 तर पेंगाँग सरोवराजवळ 3,600 सैनिक तैनात आहेत.

जाणून घ्या, काय आहेत पेंगाँग सरोवराचे 'फिंगर्स'?, यांच्यामुळेच भारत-चीन आले 'आमने-सामने'

Web Title: india china face off china pla was preparing like kargil incursion in ladakh from a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.