India China Face Off: आशियात चीनची अरेरावी चालणार नाही; अमेरिका, फ्रान्सकडून भारताची पाठराखण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 05:45 AM2020-06-20T05:45:39+5:302020-06-20T06:41:54+5:30

नरेंद्र मोदी सरकारच्या सहा वर्षांच्या काळातील राजनैतिक धोरण यशस्वी

India China Face Off Chinas bullying will not be tolerated USA France supports india | India China Face Off: आशियात चीनची अरेरावी चालणार नाही; अमेरिका, फ्रान्सकडून भारताची पाठराखण

India China Face Off: आशियात चीनची अरेरावी चालणार नाही; अमेरिका, फ्रान्सकडून भारताची पाठराखण

Next

नवी दिल्ली : चीनविरोधातफ्रान्स व अमेरिकेने भारताची बाजू घेतल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या गेल्या सहा वर्षांच्या काळातील राजनैतिक धोरण यशस्वी होताना दिसते आहे. मोदी सरकारच्या काळात प्रजासत्ताक दिनी फ्रान्सचे तत्कालीन अध्यक्ष होलांद, अमिरेकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते हे विशेष. तर अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप अलीकडेच भारतात आले होते. त्यामुळे या दोन्ही देशांची भारताशी जवळीक वाढली होती.

पॅरीसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत फ्रान्ससमवेत उभा राहिला होता. २०१६ साली प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख अतिथी फ्रान्सचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष ओलांद होते. गलवान खोऱ्यातील झटापटीनंतर चीनचे पितळ उघडे पडल्याने आंतरराष्ट्रीय समुदायातून फ्रान्स व अमेरिका या दोन्ही बलाढ्य राष्ट्रांची साथ भारताला मिळाली. फ्रान्सचे भारतातील राजदूत इम्यूनल लेनेन यांनी तर अमेरिकेचे परराष्ट्र सचिव (मंत्री) माईक पाँपो यांनी भारताच्या बाजूने विधान करून चीनला समर्थन देणाºया राष्ट्रांना कठोर संदेश दिला आहे. मात्र भारताला श्रीलंका, बांगलादेश या मित्र राष्ट्रांकडून अद्याप सकरात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. नेपाळ व पाकिस्तानने सरळ भारतविरोधी भूमिका घेतली आहे.

इम्यूनल लेनेन यांनी भारतीय शहीदांविषयी सहवेदना प्रकट केली. कर्तव्य बजावताना प्राणार्पण करणाºया सैनिकांच्या कुटुंबियांचे व भारतीयांचे सांत्वन अशी भावना लेनिन यांनी व्यक्त केली. अमेरिकादेखील भारताच्या बाजूनेच उभा राहिला आहे. चीनसमवेत झालेल्या झटापटीत मृत्यू झालेल्यांप्रती आम्ही सहवेदना व्यक्त करतो, असे ट्विट माईक पाँपो यांनी केले. गुरूवारी पाँपो व चीनचे राजनायिक यांग जिएची यांची चर्चा झाली. त्यानंतर लगेचच शुक्रवारी पाँपो यांनी भारतीय जवानांप्रती आदर व्यक्त केला. आशिया खंडात चीनची अरेरावी चालणार नाही, असा अप्रत्यक्ष संदेशच अमेरिके ने दिल्याचा दावा परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केला.

बलिदान कधीही विसरता येणार नाही
अमेरिकेचे भारतातील राजदूत केनेथ जस्टर यांनी ' भारतीय जवानांचे शौर्य व बलिदान कधीही विसरता येणार नाही' अशी भावना व्यक्त करून चीनला 'योग्य' संदेश दिला. तर जर्मनीचे भारतातील राजदूत वॉल्टर लिंडन यांनीदेखील शहीद जवानांप्रती सहवेदना प्रकट केली.
अमेरिका, फ्रान्स, जर्मनीचे राष्ट्रप्रमुख गेल्या सहा वर्षात भारत दौºयावर आले होते, हे विशेष. एरवी अमेरिकेविरोधात चीनची तळी उचलणाºया रशियाने मात्र गलवान प्रकरणी संयमी भूमिका घेतली.
रशियाचे परराष्ट्रमंत्री सरगे लॅवरो यांनी भारत-चीनमध्ये सुरू असलेल्या चर्चेचे स्वागत केले. रशियाचे राष्ट्राध्यक्ष वाल्दिमीर पुतीन यांचे प्रवक्ते डॅमट्री पेस्कोव्ह म्हणाले, '(भारत-चीन) दोन्ही आमचे अत्यंत निकटचे सहकारी आहेत.

Web Title: India China Face Off Chinas bullying will not be tolerated USA France supports india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.