India china Faceoff : पंतप्रधान मोदी लेहला पोहोचताच चीनला झोंबली मिरची, अशी आली पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 02:11 PM2020-07-03T14:11:34+5:302020-07-03T14:42:40+5:30
आपल्या दैनंदीन ब्रिफिंगदरम्यान चीनच्या परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिजियान म्हणाले, भारत आणि चीन सासत्याने सैन्य आणि राजकीय चर्चेतून सीमेवरील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा स्थितीत सीमेवर तणाव निर्माण होईल, असे कृत्य कोणत्याही पक्षाने करू नये.
बीजिंग - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानकपणे लेहला भेट दिल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. अगदी चीननेही याचा धस्का घेतला आहे. मोदींच्या या दौऱ्यासंदर्भात चीनच्या परराष्ट्रमंत्रलयानेही प्रतिक्रिया दिली आहे. परिस्थिती आणखी चिघळेल, असे कृती कुणीही करू नये, असे त्यांनी म्हटले आहे.
आपल्या दैनंदीन ब्रिफिंगदरम्यान चीनच्या परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिजियान म्हणाले, भारत आणि चीन सासत्याने सैन्य आणि राजकीय चर्चेतून सीमेवरील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा स्थितीत सीमेवर तणाव निर्माण होईल, असे कृत्य कोणत्याही पक्षाने करू नये.
पूर्व लडाखमधील सीमेवर चीनसोबत तणावाचे वातावरण असतानाच, आज (शुक्रवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेह-लडाख आणि इतरही काही ठिकाणांची पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील संरक्षण स्थितीचा आढावा घेतला. भारत-चीन सैन्यांत झालेल्या हिसंक चकमकीनंतर 18 दिवसांनी पंतप्रधानांनी या भागाचा दौरा केला आहे.
खरेतर, लष्करप्रमुख नरवणे आणि सीडीएस बिपिन रावत हे लेह-लडाखचा दौरा करणार होते. मात्र, मोदींनी अचानक लेह लडाखला भेट दिली आणि एलएसीवरील सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी बिपिन रावत आणि नरवणे हेदेखील त्यांच्या सोबतहोते. यावेळी मोदींनी येथील आयटीबीपी आणि हवाई दलाच्या जवानांसोबत चर्चा केली.
काँग्रेसचा निषाणा -
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्यावरून काँग्रेसने भाजपाला लक्ष्य केले आहे. काँग्रेस नेते मनिष तिवारी यांनी इंदिरा गांधीचा एक फोटो ट्विट करून, आता पाहुयात मोदी काय करतात? असा प्रश्न विचारला आहे. तिवारी यांनी शेअर केलेल्या या फोटोत इंदिरा गांधी जवानांना संबोधित करताना दिसत आहेत. या फोटोसोबतच मनिष तिवारी यांनी, "जेव्हा इंदिरा गांधी लेह भेटीला गेल्या होत्या, तेव्हा पाकिस्तानचे दोन तुकडे केले होते. आता, पाहुयात मोदीजी काय करतात?" असे लिहिले आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
चीनच्या ठोशाला ठोसा द्यायला भारत तयार, सर्जिकल स्ट्राइक करणारी स्पेशल फोर्स लडाखमध्ये तैनात
आता कुरापतखोर चीनचा थेट रशियावरच डोळा, या 'मोठ्या' शहरावर सांगितला दावा!
भारतानंतर आता 'हा' देशही आक्रमक, चीनविरोधात मोर्चेबांधनीला केली सुरुवात
भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!