मोदींच्या 'त्या' एका वक्तव्याने चीनचा 'जळफळाट'; पंतप्रधानांच्या भाषणावर अशी आली 'पहिली' प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 09:24 PM2020-07-03T21:24:48+5:302020-07-03T21:34:23+5:30

पंतप्रधानांनी शुक्रवारी अचानक लेह दौरा केला. येथे त्यांनी सैन्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि सद्य स्थितीचा आढावा घेला. यावेळी त्यांनी जवानांची हिंमतही वाढवली आणि चीनलाही इशारा दिला.

India China Faceoff Chinese embassy reaction on pm Modi speech in Leh | मोदींच्या 'त्या' एका वक्तव्याने चीनचा 'जळफळाट'; पंतप्रधानांच्या भाषणावर अशी आली 'पहिली' प्रतिक्रिया

मोदींच्या 'त्या' एका वक्तव्याने चीनचा 'जळफळाट'; पंतप्रधानांच्या भाषणावर अशी आली 'पहिली' प्रतिक्रिया

Next
ठळक मुद्देआम्हाला विस्तारवादी म्हणणे आधारहीन आहे - चीनआम्ही 14पैकी 12 शेजारील राष्ट्रांबरोबर असलेला सीमावाद सोडला आहे, असे दिल्ली येथील चीनी दुतावासाने म्हटले आहे.मोदी म्हणाले, गेल्या शतकात विस्तारवादी भूमिकेनेच मानवतेचे सर्वाधिक अहित केले आहे. मानवतेचा विनाश करण्याचे काम केले आहे.

बीजिंग - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेहमध्ये दिलेल्या भाषणावर चीनची प्रतिक्रिया आली आहे. आम्हाला विस्तारवादी म्हणणे आधारहीन आहे. आम्ही 14पैकी 12 शेजारील राष्ट्रांबरोबर असलेला सीमावाद सोडला आहे, असे दिल्ली येथील चीनी दुतावासाने म्हटले आहे.

चीनने चर्चेतून आपल्या 14 शेजारील देशांपैकी 12 देशांसोबत असलेला सीमा वाद संपवला आहे. चीनकडे विस्तारवादी म्हणून पाहने आधारहीन आहे, असे चीनी दुतावासाने म्हटले आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज (शुक्रवारी) अचानकपणे लेहला भेट दिली. त्यांनी येथे जवानांना संबोधित केले. तसेच नाव न घेता चीनवर निशाणा साधला.

यावेळी, भारतीय जवानांशी संवाद साधताना, विस्तारवादी धोरण राबवण्याचा काळ आता गेला. आता विकासवादाची वेळ आहे. झपाट्याने बदलने आवश्यक आहे. भविष्यात विकासवादच प्रासंगिक आहे. विकासवादासाठी संधी आहे आणि विकासवादच भविष्याचा आधार आहे, असे मोदींनी म्हटले होते. त्यांच्या याच वक्तव्यामुळे चीनचा तिळपापड झाला आहे. चीनला जबरदस्त मिरची झोंबली आहे.

काय म्हणाले मोदी - 
पंतप्रधानांनी शुक्रवारी अचानक लेह दौरा केला. येथे त्यांनी सैन्य अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि सद्य स्थितीचा आढावा घेला. यावेळी त्यांनी जवानांची हिंमतही वाढवली आणि चीनलाही इशारा दिला.

मोदी म्हणाले, गेल्या शतकात विस्तारवादी भूमिकेनेच मानवतेचे सर्वाधिक अहित केले आहे. मानवतेचा विनाश करण्याचे काम केले आहे. विस्तारवाद जेव्हा-जेव्हा एखाद्याच्या डोक्यावर स्वार झाला, तेव्हा-तेव्हा त्याने विश्व शांतीला धोका निर्माण केला आहे. इतिहास साक्षी आहे, अशा शक्तींचा नेहमीच नायनाट झाला अथवा त्या झुकल्या आहेत.

यापूर्वी, आपल्या दैनंदीन ब्रिफिंगदरम्यान चीनच्या परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिजियान म्हणेले होते, भारत आणि चीन सासत्याने सैन्य आणि राजकीय चर्चेतून सीमेवरील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा स्थितीत सीमेवर तणाव निर्माण होईल, असे कृत्य कोणत्याही पक्षाने करू नये. 

महत्त्वाच्या बातम्या -

मोदींनी 'या' ठिकाणाला भेट दिल्याने संपूर्ण जग हैराण; येथून एकाच वेळी निशाण्यावर येऊ शकतात चीन-पाकिस्तान

दिल जीत लिया... PM मोदी थेट सीमेवर, नेटिझन्सच्या आनंदाला 'सीमा'च उरली नाही!

लडाखच्या 'कुरुक्षेत्रावर' मोदी असं काही बोलले; जवानांमध्ये १२ हत्तींचे बळ संचारले!

चीनच्या ठोशाला ठोसा द्यायला भारत तयार, सर्जिकल स्ट्राइक करणारी स्पेशल फोर्स लडाखमध्ये तैनात

आता कुरापतखोर चीनचा थेट रशियावरच डोळा, या 'मोठ्या' शहरावर सांगितला दावा!

भारताकडे आहे 'अग्नीबाण', काही मिनिटांत बेचिराख होऊ शकतो चीन; 'ही' मोठी शहरं येतात थेट निशाण्यावर!

India-China faceoff: आता भारताला मिळाली या 'बलाढ्य' मित्राची साथ, चीनच्या 'घेराबंदी'ला सुरुवात; सामना करायला तयार

Web Title: India China Faceoff Chinese embassy reaction on pm Modi speech in Leh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.