India China Faceoff भारतीय जवानांचे चोख प्रत्युत्तर; झटापटीत चीनचे पाच सैनिक ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 03:02 PM2020-06-16T15:02:28+5:302020-06-16T15:37:37+5:30
दोन्ही देशांदरम्यान जवळपास पाच दशकांनंतर एवढी गंभीर घटना घडली असून लष्करप्रमुख एमएम नरवणे यांनी पठाणकोट लष्करी तळाला भेट देण्याचा दौरा रद्द केला आहे.
नवी दिल्ली : लडाखमधील भारत-चीन सीमेवर सोमवारी रात्री झालेल्या दोन्ही सैन्यांच्या झटापटीमध्ये एका अधिकाऱ्यासह तीन भारतीय जवान शहीद झाले होते. मात्र, चीनच्या सैन्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्यूत्तर दिले असून चीनचेही पाच जवान ठार झाले आहेत.
दोन्ही देशांदरम्यान जवळपास पाच दशकांनंतर एवढी गंभीर घटना घडली असून लष्करप्रमुख एमएम नरवणे यांनी पठाणकोट लष्करी तळाला भेट देण्याचा दौरा रद्द केला आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सकाळीच परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि लष्करप्रमुख नरवणे यांची बैठक बोलावली होती.
सीमेवरील तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांचे लष्करी अधिकार प्रयत्न करत आहेत. यावर चीनने भारतावर गंभीर आरोप केले असून भारतीय सैनिकांनीच दोनदा चीनची हद्द ओलांडल्याचा दावा केला आहे. तसेच भारतीय सैनिकांनीच आधी चीनच्या सैनिकांना आक्रमणासाठी चिथावणी दिल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, भारतीय सैन्याने तीन जवान शहीद झाल्याची माहिती दिली. यानंतर चीनलाही जबर नुकसान सोसावे लागले असल्याचे म्हटले होते. आता चीनच्या बाजुने भारतीय जवानांसोबतच्या झटापटीत ठार झालेल्या सैनिकांचा आकडा जाहीर करण्यात आला असून चीनचे 5 जवान ठार झाले आहेत.
भारतासोबतच्या लढायांमध्ये चीनलाच मोठे नुकसान
भारत आणि चीनमध्ये शेवटचा गोळीबार 1967 मध्ये झाला होता. म्हणजे 53 वर्षांपूर्वी. ही हिंसा सिक्किममध्ये झाली होती. चीन अशासाठी चिडला होता कारण भारत आपल्या क्षेत्रामध्ये 1962 च्या युद्धानंतर सैन्यासाठी तयारी करत होता. 1967 च्या छोट्या युद्धामध्ये भारताचे 80 जवान शहीद झाले होते तर चीनचे 400 सैनिक ठार झाले होते.
Major Generals of India and China are talking to defuse the situation in the Galwan Valley, Ladakh and other areas after the violent face-off last night in which casualties have been suffered by both sides: Army Sources pic.twitter.com/yDyiluagMD
— ANI (@ANI) June 16, 2020
कोरोना व्हायरसमुळे जगभरात टीका आणि विरोधाचा सामना करावा लागत असल्याने चीन तणावात आहे. यामुळे चीनमधील उत्पादनांची मागणीही घटलेली आहे. यामुळे चीनच्या लोकांचा विरोधही सहन करावा लागत असल्याने राष्ट्रवादाची लाट आणण्यासाठी आणि लोकांना त्यात गुंतवून ठेवण्यासाठी चीन भारत आणि तैवानसोबत तणाव वाढवू लागला आहे. यामुळे चीनने भारताच्या लडाखमध्ये घुसखोरी केली आहे. यावरून गेल्या दोन महिन्यांपासून वाद सुरु आहे. एकदा दोन्ही सैन्यादरम्यान दगडफेकही झाली आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
India China Faceoff चीनच्या उलट्या बोंबा; भारतीय सैन्यानंच आधी आक्रमण केल्याचा आरोप
Galwan Valley 1967 नंतर पहिल्यांदाच भारत-चीन सीमेवर जवान शहीद
Big Breaking भारत-चीन सीमेवर हिंसक चकमक, एका अधिकाऱ्यासह तीन जवान शहीद
संयुक्त महाराष्ट्रासाठी लढलेले ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं निधन
EPFO ची जबरदस्त सेवा सुरु; देशभरात कोणत्याही क्षेत्रिय कार्यालयात करता येणार क्लेम
खाट का कुरकुरतेय? विधान परिषदेवरून शिवसेनेचा काँग्रेसवर निशाणा
TikTok ची कंपनी भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत?; व्हिडीओ अॅप बंद करणार
"सुशांत कसा आहे?" मृत्यू सहन होईना; वहिनीने सोडला प्राण