India China FaceOff: भारत-चीन मतभेद शांततेने मिटवतील - नेपाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 02:56 AM2020-06-21T02:56:51+5:302020-06-21T02:57:04+5:30

India China FaceOff: एलएसीवरील वाद मिटवताना या भागाचे स्थैर्य व देशाची शांतता याबाबत सजग राहतील, अशी अपेक्षाही नेपाळने व्यक्त केली आहे.

India China FaceOff: India-China differences to be resolved peacefully - Nepal | India China FaceOff: भारत-चीन मतभेद शांततेने मिटवतील - नेपाळ

India China FaceOff: भारत-चीन मतभेद शांततेने मिटवतील - नेपाळ

Next

काठमांडू : भारत आणि चीन हे आपले मित्रदेश त्यांच्यातील मतभेद शांततेच्या मार्गाने मिटवतील, असा विश्वास नेपाळने व्यक्त केला आहे. हे दोन्ही देश एलएसीवरील वाद मिटवताना या भागाचे स्थैर्य व देशाची शांतता याबाबत सजग राहतील, अशी अपेक्षाही नेपाळने व्यक्त केली आहे.
आशिया खंडातील दोन बलाढ्य राष्टÑांच्या वादात अडकलेल्या नेपाळने आपण शांततेच्या बाजूने आहोत, असेही म्हटले आहे. भारत व चीन आपले शेजारी देश आहेत. ते त्यांच्यातील मतभेद शांततेच्या मार्गाने सोडवतील, असे नेपाळच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे. विशेष म्हणजे भारताचे तीन भाग आपल्या देशाच्या नकाशात दाखविण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर नेपाळचे हे वक्तव्य आले आहे. भारताचे लिपुलेख, कालापानी व लिम्पीयाधुरा हे भाग त्या देशाने त्यांच्या नकाशात दाखवले आहेत. नव्या नकाशाला संसदेत मान्यता देऊन त्याला अध्यक्षांनीही मंजुरी दिली आहे. नेपाळचे हे कृत्य चीनच्या सांगण्यावरून करण्यात आले आहे, असाही आरोप केला जात आहे. नेपाळचा नवा नकाशा भारताने साफ धुडकावून लावला आहे.

Web Title: India China FaceOff: India-China differences to be resolved peacefully - Nepal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :chinaचीन