India China Faceoff: लष्करी कारवायांसाठी नेपाळकडून चीनला सर्वात मोठ्ठं 'गिफ्ट'?; भारतीय यंत्रणा अलर्ट मोडवर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 10:49 AM2020-06-25T10:49:21+5:302020-06-25T10:52:48+5:30
नेपाळचे भूभाग चीननं बळकावले; भारतीय यंत्रणा सतर्क
नवी दिल्ली: चीनच्या कुरघोड्यांमुळे लडाख सीमेवरील तणाव वाढला आहे. चीनकडून होणाऱ्या आगळिकींना प्रत्युतर देण्यासाठी भारतीय लष्कर सज्ज आहे. त्यातच चीननं नेपाळच्या जमिनीवर कब्जा केला आहे. या मागच्या व्यूहनीतीचं विश्लेषण सध्या भारताकडून सुरू आहे. चीननं नेपाळचा नेमका कोणता भूभाग बळकावला आहे, याची माहिती मिळवण्याचं काम सध्या भारताकडून सुरू आहे. चीननं नेपाळी जमिनीवर अतिक्रमण केलं की नेपाळनं आपला भूभाग जाणूनबुजून चीनला दिला, याबद्दलचे तपशीलही गोळा केले जात आहेत.
चीननं नेपाळची जमीन ताब्यात घेतल्याचा परिणाम भारतीय सीमेवर होणार नाही ना, याचा शोध भारताकडून घेतला जात आहे. इंग्रजी वृत्तपत्र इकॉनॉमिक टाईम्सनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. 'नेपाळच्या राजकारण्यांनी किंवा पंतप्रधान केपी शर्मा ओली सरकारनं देशाची जमीन चीनला दान केली आहे का, याबद्दलची माहिती गोळा करण्याचं काम भारत सरकारकडून सुरू आहे. नेपाळनं जमीन दान दिलेली असो किंवा मग चीननं ती बळकावली असो, दोन्ही परिस्थितीत भारत आणि चीनचे संबंध बिघडू शकतात. कारण चीन सातत्यानं शेजारी देशांच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न करतो,' असं ईटीनं आपल्या वृत्तात म्हटलं आहे.
पंतप्रधान ओली यांच्यासह नेपाळ सरकारमधील वरिष्ठांनी चीनची चाल समजून घ्यायला हवी, असं नेपाळच्या जाणकारांना वाटतं. आपली खुर्ची कायम ठेवण्यासाठी ओली चीनच्या जवळ जात आहेत. मात्र त्यामुळे भारत आणि नेपाळचे संबंध बिघडत असल्याचं जाणकार सांगतात.
चीन भूभाग बळकावतोय; नेपाळ सरकारचा अहवाल
चीनच्या अप्रत्यक्ष पाठिंब्यानं भारताच्या जमिनीवर दावा सांगणाऱ्या नेपाळला आता वेगळीच भीती सतावू लागली आहे. भारतापासून दूर गेलेल्या नेपाळला आता चीनच्या विस्तारवादाचा फटका बसू लागला आहे. तिबेटमधील रस्ते निर्मिती प्रकल्पाच्या माध्यमातून चीन नेपाळमधील जागा बळकावण्याच्या प्रयत्नात आहे. चीन भविष्यात सीमेवर सैन्य चौक्या उभारेल, अशी भीती नेपाळ सरकारनं अहवालातून व्यक्त केली आहे. भारत आणि चीनच्या सैन्यात लडाखमधील गलवानमध्ये हिंसक झटापट झाल्यानंतर नेपाळ सरकारनं अहवाल प्रसिद्ध केला.
नद्यांचे प्रवाह बदलून नेपाळी भूभाग बळकावले
नेपाळी कृषी मंत्रालयाच्या सर्वेक्षण विभागानं ११ जागांची यादी तयार केली होती. यातल्या ११ जागांवर चीननं अतिक्रमण केलं आहे. या भागाचं एकूण क्षेत्रफळ ३३ हेक्टर्स इतकं आहे. अधिक भूभाग बळकवण्यासाठी चीनकडून नद्यांचे प्रवाह बदलण्याचे प्रयत्न सुरू असल्याचंही नेपाळ सरकारनं अहवालात नमूद केलं आहे. हुमला जिल्ह्यातील बगदारे खोला आणि कर्नाली नदीच्या पात्रात बदल करून चीननं १० हेक्टर जमीन बळकावली आहे. तर रासुवा जिल्ह्यातील सहा हेक्टर जागादेखील चीननं ताब्यात घेतली आहे.
चीनच्या कारवायांची थक्क करणारी गती; भारताशी पंगा घेणाऱ्या नेपाळला सतावतेय वेगळीच भीती
नाद करा, पण आमचा कुठं! भारतीय जवानांनी थेट चिनी अधिकाऱ्याला उचललं
भारत आमच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत; पाकिस्तानला सतावतेय भीती