चीन वाढवतोय आण्विक शस्त्रसाठा, भारतानंही कंबर कसली; जाणून घ्या, कुणाकडे किती साठा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 02:40 PM2020-06-15T14:40:51+5:302020-06-15T14:46:44+5:30

आण्विक शस्त्रांवर नजर ठेवणारी आंतरराष्‍ट्रीय संस्‍था सिप्रीने म्हटले आहे, की भारत आणि चीन या दोघांनीही गेल्या वर्षी आपल्याकडील आण्विक शस्त्रांमध्ये वाढ केली आहे. मात्र, भारताकडील आण्विक शस्त्रे चीनच्या तुलनेत अर्ध्याहूनही कमी आहेत.

India china increasing their nuclear weapons says sipri | चीन वाढवतोय आण्विक शस्त्रसाठा, भारतानंही कंबर कसली; जाणून घ्या, कुणाकडे किती साठा

चीन वाढवतोय आण्विक शस्त्रसाठा, भारतानंही कंबर कसली; जाणून घ्या, कुणाकडे किती साठा

Next
ठळक मुद्देचीनने आता पहिल्यांदाच जमीन, हवा आणि समुद्रातून मारा करता येतील, असे आण्विक शस्त्र तयार करायला सुरुवात केली आहे. जगातील एकूण 9 आण्विक शस्त्र संपन्न राष्ट्रेजगातील 90 टक्के आण्विक शस्त्र अमेरिका आणि रशियाकडे आहेत.

स्‍टॉकहोम : जागतीक महासत्ता बणण्याचे स्वप्न पाहत असलेला चीन आता झपाट्याने आण्विक क्षस्त्रांचा साठा वाढवू लागला आहे. चीनने आता पहिल्यांदाच जमीन, हवा आणि समुद्रातून मारा करता येतील, असे आण्विक शस्त्र तयार करायला सुरुवात केली आहे. मात्र, हे सर्व सुरू असतानाच, भारतानेही चीन आणि पाकिस्‍तानचा सामना करण्यासाठी कंबर कसली आहे आणि आपल्याकडीलही अण्विक शस्त्रसाठा वाढवायला सुरुवात केली आहे.

आण्विक शस्त्रांवर नजर ठेवणारी आंतरराष्‍ट्रीय संस्‍था सिप्रीने म्हटले आहे, की भारत आणि चीन या दोघांनीही गेल्या वर्षी आपल्याकडील आण्विक शस्त्रांमध्ये वाढ केली आहे. मात्र, भारताकडील आण्विक शस्त्रे चीनच्या तुलनेत अर्ध्याहूनही कमी आहेत. सिप्रीच्या अहवालानुसार, भारताकडे 150 तर चीनकडे 320 आण्विक शस्त्रे आहेत. गेल्या वर्षात चीनने 30 आण्विक शस्त्र तयार केली आहेत. तर भारताने 10 आण्विक शस्त्र तयार केली आहेत.

CoronaVirus News: होऊ नयेत अमेरिकेसारखे हाल; म्हणून, कोरोनावर मात करण्यासाठी मोदी सरकारचा प्लॅन तयार

पाकिस्‍तानकडे एकूण 160 आण्विक शस्त्र -
पाकिस्तानकडे भारतापेक्षा अधिक आण्विक शस्त्र आहेत. त्यांच्याकडे एकूण 160 आण्विक शस्त्र आहेत. भारत-चीन यांच्यात तणावाचे वातावरण असताना आणि लडाखमध्ये दोन्ही देशांचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकलेले असतानाच सिप्रीचा हा अहवाल आला आहे. 

दिलासादायक! कोरोना होतोय हद्दपार; 'या' 26 देशांमध्ये आता एकही रुग्ण नाही

अमेरिका-रशियामुळे घटली जगातील आण्विक शस्त्रांची संख्या
एकीकडे आण्विक शस्त्रास्त्रांनी संपन्न असलेले आशियातील तीन देश आण्विक शस्त्रांस्त्रांची संख्या वाढवत आहेत. तर जगातील एकूण आण्विक शस्त्रांच्या संख्येत घट झाल्याचे दिसत आहे. या अहवालात म्हणण्यात आले आहे, की जगातील 90 टक्के आण्विक शस्त्र अमेरिका आणि रशियाकडे आहेत. मात्र, ते आपले आण्विक शस्त्र नष्ट करत आहेत. जगातील एकूण 9 आण्विक शस्त्र संपन्न राष्ट्रे, अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स, चीन, भारत, पाकिस्‍तान, इस्रायल आणि उत्‍तर कोरिया यांच्याकडे एकूण 13,400 आण्विक शस्त्र आहेत. गेल्या वर्षांत या शस्त्रांची एकूण संख्या 13,865 एवढी होती.

CoronaVirus News: धक्कादायक! देशातील 50%वर कोरोनाबाधित फक्त 6 शहरांत, महाराष्ट्रातल्या तीन बड्या शहरांचा समावेश

Web Title: India china increasing their nuclear weapons says sipri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.