जम्मू-काश्मीरवर बोलून चीननं केली मोठी चूक; भारतानं दिलं सणसणीत उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 12:52 AM2022-03-24T00:52:47+5:302022-03-24T00:54:01+5:30

बागची म्हणाले, जम्मू आणि काश्मीर संदर्भातील प्रश्न भारताचा अंतर्गत मुद्दा...

India China India rejects chinese foreign ministers statements on jammu kashmir | जम्मू-काश्मीरवर बोलून चीननं केली मोठी चूक; भारतानं दिलं सणसणीत उत्तर

जम्मू-काश्मीरवर बोलून चीननं केली मोठी चूक; भारतानं दिलं सणसणीत उत्तर

googlenewsNext

नवी दिल्ली - भारताने पाकिस्तानमध्ये (Pakistan) झालेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनच्या (OIC) बैठकीत चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी (Wang Yi) यांनी जम्मू-काश्मीरसंदर्भात केलेली वक्तव्यं ‘अनावश्यक’ असल्याचे म्हणत फेटाळून लावली आहेत. एवढेच नाही, तर जम्मू आणि काश्मीरसंदर्भातील सर्व मुद्दे, हे पूर्णपणे देशांतर्गत विषय असल्याचेही भारताने म्हटले आहे

भारताने चीनची वक्तव्यं फेटाळून लावली -
ओआयसीच्या बैठकीत वांग यांनी जम्मू काश्मीरचा उल्लेख केला. यावर, परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची (Arindam Bagchi) म्हणाले, ‘आम्ही, उद्घाटन सत्राच्या (Opening Session) भाषणादरम्यान चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी भारतासंदर्भात केलेली अनावश्यक वक्तव्यं फेटाळून लावतो.
 
'इतर देशांना भाष्य करण्याचा अधिकार नाही -
बागची म्हणाले, जम्मू आणि काश्मीर संदर्भातील प्रश्न भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. 'चीनसह इतर कोणत्याही देशाला यावर भाष्य करण्याचा अधिकार नाही. भारत त्यांच्या अंतर्गत प्रश्नांवर सार्वजनिकरित्या भाष्य करणे टाळतो, हे त्यांना समजायला हवे.' बागची पत्रकारांशी बोलत होते.

चीनचे परराष्ट्रमंत्री म्हणाले... - 
वांग बैठकीत म्हणाले, ‘काश्मीर (Kashmir) संदर्भात आम्ही आज पुन्हा एकदा आमच्या इस्लामिक मित्रांचे (Islamic Friends) बोलणे एकले. चीनलाही हीच अपेक्षा आहे.'
 

 

Web Title: India China India rejects chinese foreign ministers statements on jammu kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.