दहशतवादाविरुद्ध भारत-चीन एकत्र

By admin | Published: September 28, 2016 12:57 AM2016-09-28T00:57:18+5:302016-09-28T00:57:18+5:30

पाकिस्तानकडून भारताविरोधात दहशतवादी कारवाया सुरू असतानाच, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत सहकार्य आणि सुरक्षा वाढविण्याच्या दृष्टीने भारत आणि चीन यांच्यात मंगळवारी

India-China together with terrorism | दहशतवादाविरुद्ध भारत-चीन एकत्र

दहशतवादाविरुद्ध भारत-चीन एकत्र

Next

बीजिंग : पाकिस्तानकडून भारताविरोधात दहशतवादी कारवाया सुरू असतानाच, दहशतवादाविरुद्धच्या लढाईत सहकार्य आणि सुरक्षा वाढविण्याच्या दृष्टीने भारत आणि चीन यांच्यात मंगळवारी उच्चस्तरीय चर्चा झाली. दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. अलिकडच्या काळात अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर भारताला उघड विरोध करणारा चीन यानिमित्ताने आपली भूमिका बदलताना आता दिसत आहे. चीनने अनेकदा पाकिस्तानची बाजू घेतली असली, तरी काश्मीरसंदर्भात चीनने कधीही पाकच्या म्हणण्याला दुजोरा दिलेला नाही.
गुप्तचर विभागाचे प्रमुख आर. एन. रवी आणि चीनच्या केंद्रीय राजकीय व कायदेविषयक विभागाच्या आयोगाचे महासचिव वांग योंगक्विंग यांच्या अध्यक्षतेत ही चर्चा झाली. भारतीय दूतावासाकडून येथे जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी दोन्ही देशांनी आपली पद्धत, धोरणे आणि कायदेविषयक माहितीची देवाणघेवाण केली. संभाव्य धोक्यापासून सुरक्षा करण्याचे उपाय, दहशतवादाविरुद्ध लढाई आणि सुरक्षेबाबत सहकार्य या विषयावर दोन्ही देशांत चर्चा झाली. अनेक मुद्द्यांवर दोन्ही बाजूंनी सहमती झाली. दहशतवादाविरुद्ध भारत-चीन एकवटल्याचा संदेश यातून गेला आहे. (वृत्तसंस्था)

एनएसजीला केला
होता विरोध
भारताच्या एनएसजी (अणु पुरवठादार समूह) सदस्यत्वाला विरोध करण्यात चीनच अग्रेसर होता, हे विशेष. चीनने खोडा घातल्यामुळेच भारताचे हे प्रयत्न यशस्वी झाले नव्हते. अर्थात, भारताला विरोध करताना चीनची पाकिस्तानशी असलेली जवळीक कधी लपून राहिली नाही.
कारण, पाकच्या काही अतिरेक्यांना दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी भारताने जेव्हा संयुक्त राष्ट्र संघात प्रयत्न केले तेव्हाही चीननेच खोडा घातला होता. अलिकडच्या काळात भारताबाबत चीनची भूमिका नकारात्मकच राहिली आहे. अशा पार्श्वभूमीवर आता दहशतवादाविरुद्ध भारतासह सहकार्य करण्याची चीनची भूमिका सकारात्मक मानली जाते.

Web Title: India-China together with terrorism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.