अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा प्रभाव वाढला; भारताने घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 11:06 PM2021-07-06T23:06:26+5:302021-07-06T23:07:39+5:30
तालिबानने उत्तर अफगाणिस्तानमधील अनेक जिल्हे ताब्यात घेतले आहेत. यामुळे अनेक देशांच्या चिंतेत भर पडली आहे.
काबूल: अमेरिकेच्या फौजांनी माघार घेण्यास सुरुवात केल्यानंतर आता अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा तालिबान अधिक आक्रमक होत आहे. तालिबानने उत्तर अफगाणिस्तानमधील अनेक जिल्हे ताब्यात घेतले आहेत. यामुळे अनेक देशांच्या चिंतेत भर पडली आहे. यातच आता भारताने मोठा निर्णय घेतला असून, त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती मिळाली आहे. (india evacuate nationals and officials from afghanistan taliban territories)
अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांच्या वाढत्या प्रभावामुळे भारतही चिंतेत असल्याचे सांगितले जात आहे. एका वृत्तवाहिनीला मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तानात तैनात असलेले भारतीय अधिकारी व नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. तालिबान्यांनी अफगाणिस्तानातील बर्याच भागांचा ताबा घेतल्याने सुरक्षा परिस्थिती वेगाने ढासळत आहे. त्यामुळे आपल्या अधिकारी आणि नागरिकांच्या सुरक्षितेला प्राधान्य देत भारत सरकार त्यांना अफगाणिस्तानबाहेर काढणार आहे.
आता पश्चिम बंगालमध्ये साजरा होणार ‘खेला होबे दिवस’; ममता बॅनर्जींनी केली घोषणा
भारतीयांना बाहेर काढण्याची योजना तयार
भारताने काबूल, कंधार आणि मझार शरीफ येथे असलेले आपले कर्मचारी आणि इतर भारतीयांना अफगाणिस्तान बाहेर काढण्याची योजना भारताने तयार केली आहे. अफगाणिस्तानातील शहरे व ग्रामीण, दुर्गम भागातील सुरक्षा परिस्थिती गंभीर होतेय. यामुळे दूतावासांचे कामकाज अवघड होत चालले आहे. अफगाण अधिकारी स्वतःच तालिबान हल्ल्याच्या भीतीने सरकारच्या नियंत्रणातील प्रदेशातून पळ काढत आहेत, असे सांगितले जात आहे.
अनिल अंबानींना मोठा धक्का! ‘या’ कंपनीच्या परवाना नुतनीकरणाला केंद्राचा नकार
भारताचे चार वाणिज्य दूतावास
अफगाणिस्तानमध्ये भारताचे चार वाणिज्य दूतावास होते. हे दूतावास काबूल येथील दूतावासाच्या संपर्कात होते. अफगाणिस्तानमधून भारतीय दूतावासातील सर्वच कर्मचाऱ्यांना भारतात पुन्हा आणणार की, काही कर्मचारी तेथेच राहणार, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. जगातील काही देशांनी तालिबानसोबत चर्चा सुरू केली आहे. तर, भारतीय अधिकाऱ्यांनीही तालिबान नेत्यांची भेट घेतली असल्याचा दावा कतारच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, एप्रिल महिन्यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेण्याची घोषणा केली. त्यानंतर नाटोनेही आपले सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत तालिबानने बर्याच ठिकाणांचा ताबा घेतला आहे.