पठाणकोट हल्ल्याचे पुरावे देण्यात भारत अपयशी, पाकिस्तानी प्रसारमाध्यमांचा दावा
By admin | Published: April 2, 2016 07:36 PM2016-04-02T19:36:20+5:302016-04-02T19:36:20+5:30
पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी भारतात येऊन गेलेल्या पाकिस्तान तपास पथकाने पठाणकोट हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचा पुरावा देण्यात भारत अपयशी ठरल्याचा दावा केला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत -
इस्लामाबाद, दि. २ - पठाणकोट दहशतवादी हल्ल्याचा तपास करण्यासाठी भारतात येऊन गेलेल्या पाकिस्तान तपास पथकाने पठाणकोट हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचा पुरावा देण्यात भारत अपयशी ठरल्याचा दावा केला आहे. हल्ल्यात पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचा हात आहे असं सिद्ध करणारा एकही पुरावा भारत देऊ शकलेला नाही अशी माहिती तपास पथकाने दिल्याचं वृत्त पाकिस्तानमधील काही प्रसारमाध्यमांनी दिलं आहे.
पाकिस्तान तपास पथकाला पठाणकोटमधील एअरबेसमध्ये जाण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र तिथे फक्त 55 मिनिटे आम्हाला पाहणी करु दिली. इतक्या कमी वेळेत तपास पथक पुरावे गोळा करु शकत नाही अशी माहिती तपास पथकातील सुत्रांनी दिल्याचं जिओ न्यूजने वृत्त दिलं आहे. पाकिस्तान तपास पथकाला 29 मार्चला पठाणकोट एअरबेस जिथे हल्ला झाला त्याठिकाणी नेण्यात आलं होतं. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) अधिका-यांनी यावेळी त्यांना हल्ल्याची माहिती दिली होती.