सुंदर स्त्री बनून भारत भुरळ घालतोय - चीन प्रसारमाध्यमे
By admin | Published: April 18, 2016 04:31 PM2016-04-18T16:31:41+5:302016-04-18T16:31:41+5:30
भारताला सुंदर स्त्री बनून जगातील सर्व देशांना आपल्याकडे आकर्षित करायचे आहे. विशेषकरुन अमेरिका आणि चीनला अशा शब्दात चीनी प्रसारमाध्यमांनी भारतावर टीका केली आहे.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
बिजिंग, दि. १८ - भारताला सुंदर स्त्री बनून जगातील सर्व देशांना आपल्याकडे आकर्षित करायचे आहे. विशेषकरुन अमेरिका आणि चीनला अशा शब्दात चीनी प्रसारमाध्यमांनी भारताच्या अमेरिकेबरोबरच्या वाढत्या निकटतेवर टीका केली आहे. चीनी प्रसारमाध्यमांनी अमेरिकेबरोबर लॉजिस्टिक करार करण्याच्या भारताच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे.
दोन्ही देशांमध्ये परस्परांबद्दल असलेल्या अविश्वासामुळे हा करार रखडला आहे असे चीनी माध्यमांनी म्हटले आहे. दोन महासत्तांमध्ये झुलत राहून आपला फायदा करुन घेण्याची भारताची महत्वकांक्षा असल्याचे ग्लोबल टाईम्समधल्या लेखात म्हटले आहे.
भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या पहिल्या चीन दौ-याला आजपासून सुरुवात झाली. त्या पार्श्वभूमीवर चीनी माध्यमांनी भारत-अमेरिकेमधील करारावर आपली नाराजी प्रगट केली आहे. भारताची सध्याची भूमिका अजिबात नवीन नाही. शीत युद्धाच्या काळात भारताने आपल्या कुशल मुत्सद्देगिरीच्या बळावर विशेष स्थान मिळवले होते असे या लेखात म्हटले आहे.