चीनला घाम फुटणार...; भारत व्हिएतनामला मोठं गिफ्ट देणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 12:32 PM2023-06-20T12:32:09+5:302023-06-20T12:33:49+5:30

भारताच्या या घोषणेमुळे चीनचे टेन्शन वाढू शकते.

India gift ins kirpan to vietnam tension increase of china | चीनला घाम फुटणार...; भारत व्हिएतनामला मोठं गिफ्ट देणार!

चीनला घाम फुटणार...; भारत व्हिएतनामला मोठं गिफ्ट देणार!

googlenewsNext

केवळ भारतच नाही, तर इतरही अनेक शेजारील देसांसोबत चीनचे संबंध बरे नाहीत. यातच एक नाव म्हणजे व्हिएतनाम. भारता प्रमाणेच व्हिएतनामही चीनच्या धमक्यांना जशास तसे उत्तर देत असतो. यातच भारत दौऱ्यावर असलेल्या संरक्षण मंत्र्यांच्या भेटीदरम्या भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मोठी घोषणा केली आहे. भारत व्हिएतनामला स्वदेशी बनावटीची आयएनएस कृपाण गिफ्ट करणार आहे. भारताच्या या घोषणेमुळे चीनचे टेन्शन वाढू शकते.

व्हिएतनामचे संरक्षणमंत्री जनरल फान वान जियांग यांच्या भेटीदरम्यान भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी घोषणा करत, मित्र व्हिएतनामला स्वदेशी बनावटीची आयएनएस कृपाण ही युद्धनौका गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. याच बरोबर, भारताने व्हिएतनामसोबत पाणबुडी आणि फायटर जेट ऑपरेशन्स, सायबर सुरक्षा आणि व्हिएतनामी सैनिकांचे प्रशिक्षण वाढविण्यासंदर्भात विचार करण्यात यावा असे म्हटले आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि त्यांचे व्हिएतनामचे समकक्ष जनरल फान वान जियांग यांच्या सोमवारी नेतृत्वात प्रतिनिधा मंडळस्थळावरील चर्चा पार पडली. यात प्रामुख्याने परस्पर सहकार्याचे क्षेत्र, विशेषत: संरक्षण-औद्योगिक सहकार्य आणि सागरी सुरक्षा आदींवर चर्चा झाली. या शिवाय, जमिनीवरून हवेत मारा करणारी आकाश क्षेपणास्त्र प्रणाली, ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रे आणि इतर लष्करी हार्डवेअर संदर्भात संभाव्य अधिग्रहणासंदर्भातही दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा झाली.

यावेळी व्हिएतनामच्या संरक्षणमंत्र्यांनी संरक्षण संशोधन आणि संरक्षण औद्योगिक क्षमता वाढवण्याच्या पद्धतींवर चर्चा करण्यासाठी DRDO च्या मुख्यालयालाही भेट दिली. महत्वाचे म्हणजे, "व्हिएतनाम स्वदेशी बनावटीचे आकाश हवाई संरक्षण मिसाईल्स सारखी प्रणाली मिळविण्यासाठीही भारतासोबत चर्चा करत आहे. या डील सांठी त्यांनी उत्सुकता दर्शवली आहे."

आयएनएस कृपाणची ताकद 
आयएनएस हे स्वदेशी बनावटीचे जहाज आहे. हे जहाज भारतीय नोदलाचे एक अभिन्न अंग आहे. 1350 टन वजनाचे हे अत्याधुनिक जहाज 91 मीटर लांब, तर 11 मीटर रुंदीचे आहे. समुद्रात 46 किमी प्रति तास वेगाने यात 120 लोक राहू शकतात. यात 30 एमएमची क्लोज रेन्ज गनही असते. जी पृष्ठभागावरून पृष्ठ भागावर मारा करणाऱ्या मिसाईलने सज्ज आहे. ही नौका 1991 मध्ये भारतीय नौदलात सामील करण्यात आली होती.

 

Web Title: India gift ins kirpan to vietnam tension increase of china

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.