भारताला पाकच्या न्यायप्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा हक्क नाही - हाफीज सईद बरळला

By admin | Published: May 5, 2015 10:28 AM2015-05-05T10:28:58+5:302015-05-05T10:30:52+5:30

झकी ऊर रेहमान लख्वी निर्दोष असल्याचे सांगत भारताला पाकिस्तानच्या न्यायप्रक्रियेेत हस्तक्षेप करण्याचा हक्क नाही असे विधान दावा जमात उद दावाचा प्रमुख हाफीज सईद याने केला आहे.

India has no right to interfere in Pakistan's justice process - Hafeez Saeed Bawla | भारताला पाकच्या न्यायप्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा हक्क नाही - हाफीज सईद बरळला

भारताला पाकच्या न्यायप्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा हक्क नाही - हाफीज सईद बरळला

Next

ऑनलाइन लोकमत 

लाहोर, दि. ५ -  मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झकी ऊर रेहमान लख्वी निर्दोष असल्याचे सांगत भारताला पाकिस्तानच्या न्यायप्रक्रियेेत हस्तक्षेप करण्याचा हक्क नाही असे विधान दावा जमात उद दावाचा प्रमुख हाफीज सईद याने केला आहे. याप्रकरणात अमेरिका व संयुक्त राष्ट्राच्या मदतीने भारत पाकिस्तानवर दबाव टाकत आहे असा आरोप करत सईदने भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. 

झकीऊर रेहमान लख्वीच्या सुटकेप्रकरणी हस्तक्षेप करण्याच्या भारताच्या मागणीवर संयुक्त राष्ट्राने सकारात्मक प्रतिसाद दिला असतानात जमात उद दावा या दहशतवादी संघटनेचा प्रमुख व मुंबई हल्ल्याचा सूत्रधार हाफीज सईद पुन्हा एकदा भारताविरोधात बरळला आहे. भारताकडे लख्वीविरोधात पुरावेच नसतानाही त्याला शिक्षा देण्यात यावी यासाठी भारत पाकवर दबाव टाकत आहे. भारताने पाकिस्तानच्या न्यायालयांचा निर्णय कधीच स्वीकारला नाही असे हाफीज सईदने म्हटले आहे.   

Web Title: India has no right to interfere in Pakistan's justice process - Hafeez Saeed Bawla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.