ट्रम्प यांच्या मध्यस्थीबाबत भारताकडून भाष्य नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 01:59 AM2019-09-25T01:59:20+5:302019-09-25T01:59:47+5:30
न्यूयॉर्क : भारत आणि पाकिस्तान यांची इच्छा असेल तर काश्मीर मुद्यावर मध्यस्थ बनण्यास तयार आहे, या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ...
न्यूयॉर्क : भारत आणि पाकिस्तान यांची इच्छा असेल तर काश्मीर मुद्यावर मध्यस्थ बनण्यास तयार आहे, या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानावर कोणतेही भाष्य करण्यास परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पश्चिम) ए. गितेश सरमा यांनी नकार दिला. तथापि, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यातील द्विपक्षीय चर्चेच्या बैठकीची प्रतीक्षा करा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव ए. गितेश सरमा म्हणाले की, पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यातील बैठकीची आम्हाला प्रतीक्षा करायला हवी. काश्मीरबाबत भारताने घेतलेल्या निर्णयानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव आहे. ट्रम्प यांच्या मध्यस्थीबाबत बोलताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सरमा यांच्या उत्तराचा हवाला दिला. कुमार म्हणाले की, मला असे वाटते संयम
ठेवावा. (वृत्तसंस्था)