‘शत्रूचा शत्रू मित्र’, चीनसोबतचे संबंध बिघडत असताना अमेरिकेचं भारतासाठी मोठं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 12:03 AM2022-08-28T00:03:15+5:302022-08-28T00:07:01+5:30
माईक गिल्डे म्हणाले, भविष्यात भारत हा चीनला काउंटर करण्यासाठी, अमेरिकेचा एक मोठा सहकारी सिद्ध होईल.
'शत्रूचा शत्रू हा मित्र' असतो, अशी एक म्हण प्रसिद्ध आहे. चीनसोबतचे संबंध बिघडत असताना, आता अमेरिकाहीभारताकडे अशाच भूमिकेतून पाहत आहे. महत्वाचे म्हणजे, अमेरिकन नौदलाचे ऑपरेशनल हेड अॅडमिरल माइक गिल्डे यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून हेच सिद्ध होत. माईक गिल्डे म्हणाले, भविष्यात भारत हा चीनला काउंटर करण्यासाठी, अमेरिकेचा एक मोठा सहकारी सिद्ध होईल. वॉशिंग्टन येथे आयोजित एका चर्चासत्रात गिल्डे यांनी हे वक्तव्य केले आहे.
सध्या अमेरिका आणि चीन यांचे संबंध ताणले गेलेले आहेत. कारण, अमेरिकन प्रतिनिधी सभेच्या अध्यक्ष्य नँसी पेलोसी आणि नंतर अमेरन खासदारांचा एक गटही तैयवानमध्ये गेला होता. चीनने याला हे आपल्या सार्वभौमत्वावरील प्रश्न चिन्ह असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर अमेरिकेला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही चीनने दिला आहे.
भारताचे जबरदस्त कौतुक -
अमेरिकेन नौदलाचे सर्वोच्च अधिकारी माईक गिल्डे म्हणाले, चीनला रोखण्यासाठी जपान आणि भारताच्या रूपात दोन महत्त्वाचे प्रतिकार आहेत. तैवानच्या बाबत चीनची नियत बदलली, तर भारत आणि जपान त्याला रोखण्यात मोठी भूमिका बजावू शकतात. याशिवाय, भारताचे कौतुक करताना, आपण कोणत्याही देशाच्या तुलनेत भारताचे अधिक वेळादौरे केल्याचेही गिल्डे यांनी यावेळी सांगितले.