दहशतवादाविरुद्ध भारत, इस्रायलचे परस्पर सहकार्य
By Admin | Published: November 8, 2014 02:12 AM2014-11-08T02:12:35+5:302014-11-08T02:12:35+5:30
जागतिक दहशतवादाचा वाढता धोका अधोरेखित करताना भारत आणि इस्रायलने याचा मुकाबला करण्याचा तसेच सायबर सुरक्षा क्षेत्रात सहकार्य वाढविण्याचा निर्धार केला आहे.
तेल अवीव : जागतिक दहशतवादाचा वाढता धोका अधोरेखित करताना भारत आणि इस्रायलने याचा मुकाबला करण्याचा तसेच सायबर सुरक्षा क्षेत्रात सहकार्य वाढविण्याचा निर्धार केला आहे.
इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी गुरुवारी रात्री झालेल्या भेटीत भारताचे गृहमंत्री राजनाथसिंह यांनी प्रादेशिक स्थिती व दहशतवादामुळे जागतिक समुदायासमोर उद्भवत असलेल्या धोक्यांवर चर्चा केली. दरम्यान, मेक इन इंडिया मोहीम इस्रायलमध्ये दुमदुमत असतानाच भारताने या ज्यू देशाला नव्या सरकारच्या गुंतवणूकपूरक धोरणाचा लाभ घेऊन संरक्षणासारख्या सामरिक क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. यावर नेतान्याहू यांनी आपला देश या मोहिमेचा लाभ घेण्यास उत्सुक असल्याचे सांगून शिष्टमंडळ पाठविण्याचा मनोदय व्यक्त केला.
(वृत्तसंस्था)