Pakistan Economic Crisis: पाकिस्तानला संकटातून बाहेर काढण्यासाठी भारत मदत करणार? एस जयशंकर यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 01:44 PM2023-02-22T13:44:21+5:302023-02-22T13:49:33+5:30

pakistan economic crisis: मागिल काही महिन्यांपासून पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला असून आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करत आहेत.

india on pakistan economic crisis s jaishankar says pakistan future will be determined by its own action | Pakistan Economic Crisis: पाकिस्तानला संकटातून बाहेर काढण्यासाठी भारत मदत करणार? एस जयशंकर यांनी स्पष्टच सांगितलं

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानला संकटातून बाहेर काढण्यासाठी भारत मदत करणार? एस जयशंकर यांनी स्पष्टच सांगितलं

googlenewsNext

Pakistan Economic Crisis: मागिल काही महिन्यांपासून पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला असून आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करत आहेत. सध्या पाकिस्तानमध्ये डाळ, पीठ, तेल, गॅस यासारख्या वस्तुंच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या आर्थिक संकटावरुन आता भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

पाकिस्तानचे भविष्य मुख्यत्वे त्यांच्या स्वतःच्या कृती आणि निवडींवर निश्चित केले जाईल.' आर्थिक संकटातून कसे बाहेर पडायचे हे पाकिस्तानवर अवलंबून आहे, अशी प्रतिक्रिया परराष्ट्र मंत्री एस जय शंकर यांनी दिली. 

भारताने श्रीलंकेला दिलेल्या मदतीचा संदर्भ देत जयशंकर म्हणाले की, गंभीर आर्थिक संकटात भारताने श्रीलंकेला मदत केली. पण भारत आणि श्रीलंकेचे संबंध पाकिस्तानपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत.

परकीय चलनाची घटता साठा, उच्च चलनवाढीचा दर आणि पाकिस्तानी चलनात मोठी घसरण यामुळे पाकिस्तान गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. यावर मात करण्यासाठी, पाकिस्तान आयएमएफकडून बेलआउट पॅकेज मिळविण्यासाठी उच्च कर दर लागू करण्यास तयार आहे. मुलाखतीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले, "कोणीही अचानक आणि अनावश्यकपणे स्वतःला कठीण परिस्थितीत सापडत नाही. आज आमचे पाकिस्तानशी असे संबंध नाहीत की आम्ही त्या मदतीत थेट सहभागी आहोत. "यावर मात करण्याचा मार्ग शोधणे हे आपल्या शेजारील देशावर अवलंबून आहे."

'मला वाटते की पाकिस्तानचे भवितव्य मुख्यत्वे पाकिस्तानच्या कृती आणि निवडींवर ठरते. पाकिस्तानची श्रीलंकेशी तुलना करण्यास नकार देताना ते म्हणाले की, भारताचे दोन्ही देशांसोबतचे संबंध पूर्णपणे भिन्न आहेत. भारताचे श्रीलंकेशी वेगळे संबंध आहेत. 

Turkey Earthquake: तुर्की पुन्हा भूकंपाने हादरलं; तीव्रता ६.४ रिश्टर स्केल, काही इमारती जमीनदोस्त

यावेळी जयशंकर यांनी भारतीय लोकांच्या श्रीलंका आणि पाकिस्तानबद्दलच्या भावनांचाही उल्लेख केला. पाकिस्तान भारतात सीमापार दहशतवादाला प्रोत्साहन देत आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांवर गंभीर परिणाम झाला आहे, असंही जयशंकर म्हणाले.

'भारत आपल्या शेजाऱ्यांना कठीण परिस्थितीत मदत करण्यास सदैव तयार आहे.जर मी श्रीलंकेशी तुलना केली तर ते खूप वेगळे नाते आहे. श्रीलंकेबद्दल भारतात अजूनही खूप सहानुभूती आहे. शेजार्‍यांच्या चिंता ही भारताची चिंता असणे स्वाभाविक आहे आणि आपण त्यांना सामोरे जाण्यास मदत केली पाहिजे. पण, पाकिस्तानबाबत देशातील जनतेच्या भावना काय आहेत, हेही तुम्हाला माहीत आहे, असंही जयशंकर म्हणाले.  (Pakistan Economic Crisis)

Web Title: india on pakistan economic crisis s jaishankar says pakistan future will be determined by its own action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.