मांस खाणाऱ्या गणेशाच्या जाहिरातीला भारताचा विरोध; कारवाईची केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 09:55 AM2017-09-12T09:55:25+5:302017-09-12T09:58:27+5:30

ऑस्ट्रेलियात एका जाहिरातीत गणपतीला मांसाहार करताना दाखविण्यात आलं होतं. भारतीय दूतावासाने या आक्षेपार्ह जाहिरातीला विरोध दर्शवत या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

India opposes the advertisement of Ganesha eating meat; Action demand | मांस खाणाऱ्या गणेशाच्या जाहिरातीला भारताचा विरोध; कारवाईची केली मागणी

मांस खाणाऱ्या गणेशाच्या जाहिरातीला भारताचा विरोध; कारवाईची केली मागणी

Next
ठळक मुद्दे ऑस्ट्रेलियात एका जाहिरातीत गणपतीला मांसाहार करताना दाखविण्यात आलं होतं. भारतीय दूतावासाने या आक्षेपार्ह जाहिरातीला विरोध दर्शवत या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे ऑस्ट्रेलियाचा परराष्ट्र विभाग, कम्युनिकेशन्स आणि कृषी विभागाला कॅनबेराच्या भारतीय उच्चायुक्तालयाने पत्र पाठवलं आहे. 'मीट अँड लाइवस्टॉक ऑस्ट्रेलिया' ची ही जाहिरात भारतीयांच्या भावना दुखावणारी असून या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

कॅनबेरा, दि. 12- ऑस्ट्रेलियात एका जाहिरातीत गणपतीला मांसाहार करताना दाखविण्यात आलं होतं. भारतीय दूतावासाने या आक्षेपार्ह जाहिरातीला विरोध दर्शवत या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. ऑस्ट्रेलियाचा परराष्ट्र विभाग, कम्युनिकेशन्स आणि कृषी विभागाला कॅनबेराच्या भारतीय उच्चायुक्तालयाने पत्र पाठवलं आहे. 'मीट अँड लाइवस्टॉक ऑस्ट्रेलिया' ची ही जाहिरात भारतीयांच्या भावना दुखावणारी असून या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाने या जाहिरातीला तीव्र विरोध केला आहे. मांस उत्पादक समूह 'मीट अँड लाइवस्टॉक ऑस्ट्रेलिया' ची ही जाहिरात अपमानजनक असून भारतीय समुदायाच्या धार्मिक भावना दुखावणारी असल्याचं भारतीय उच्चायुक्तालयाने सांगितलं आहे. या जाहिरातीत गणपतीला इतर धर्मांच्या प्रतिनिधींसह कोकराचं मांस खाताना दाखवण्यात आलं आहे. गणेशाला कधीही मांसाचा नैवैद्य दाखवला जात नाही. परिणामी ही वादग्रस्त जाहिरात मागे घेतली जावी, अशी मागणी भारतीय उच्चायुक्तालयाने केली आहे.

सिडनीतल्या भारतीय महावाणिज्यदूतांनी हे प्रकरण थेट 'मीट अँड लाइवस्टॉक ऑस्ट्रेलिया' च्या समोर नेले असून ही जाहिरात मागे घेण्याची मागणी केली आहे. असं भारतीय उच्चायुक्तालयाकडून सांगण्यात आलं आहे. अनेक सामाजिक संघटनांनीसुद्धा या जाहिरातीचा निषेध केला आहे. मांसाची विक्री वाढवण्यासाठी गणेशाची प्रतिमा वापरण्याचा प्रयत्न निंदनीय आणि घृणास्पद असल्याचं ऑस्ट्रेलियाच्या हिंदू परिषदेनं म्हटलं आहे. तर दुसरीकडे  'आमचा उद्देश विविधतेतून एकतेचा संदेश देण्याचा होता,' असं म्हणत 'मीट अँड लाइवस्टॉक ऑस्ट्रेलिया' ने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.

या जाहिरातीविरोधात आतापर्यंत ३० पेक्षा जास्त तक्रारी आल्या असल्याची माहिती अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स ब्युरो या ऑस्ट्रेलियाच्या जाहिरात नियामक संस्थेने दिली आहे. या जाहिरातीविरोधात एक ऑनलाइन मोहिमही चालवण्यात आली. सोशल मीडियावरही या जाहिरातीला खूप विरोध होत आहे. गणेश चतुर्थीनंतर काही दिवसांतच प्रदर्शित झालेल्या या जाहिरातीत भगवान गणेशासह ईसा मसीह आणि गौतम बुद्धांसह अनेक धर्मांचे प्रतिनिधी किंवा संस्थापक खाण्याच्या टेबलवर बसले आहेत. खाताना ते आपापसात संवाद साधत आहेत, या संभाषणात हजरत मोहम्मदाचाही उल्लेख आहे.
 

Web Title: India opposes the advertisement of Ganesha eating meat; Action demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.