जगातील सर्वाधिक सामर्थ्यशाली देशांच्या यादीतून भारत बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 11:27 AM2020-10-20T11:27:47+5:302020-10-20T11:28:42+5:30

india out from worlds powerful country list: भारताचे गुण कमी झाल्यानं यादीतून बाहेर

india out from worlds powerful country list due to coronavirus crisis | जगातील सर्वाधिक सामर्थ्यशाली देशांच्या यादीतून भारत बाहेर

जगातील सर्वाधिक सामर्थ्यशाली देशांच्या यादीतून भारत बाहेर

Next

मुंबई: चालू वर्षातील सामर्थ्यशाली देशांची यादी जाहीर झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या यादीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. मात्र भारत या यादीतून बाहेर पडला आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भारताचे दोन गुण कमी झाले आहेत. सिडनीतल्या लोवी इन्स्टिट्यूनं या संदर्भातील आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

लोवी इन्स्टिट्यूच्या आशिया पॉवर इंडेक्सनुसार २०१९ मध्ये भारताला ४१ गुण होते. त्यात आता घट झाली आहे. यंदा भारताला ३९.७ गुण मिळाले आहेत. ४० किंवा त्यापेक्षा जास्त गुण असलेल्या देशांनाच सामर्थ्यशाली देशांच्या यादीत स्थान मिळतं. मात्र यंदा या यादीतील भारताचा समावेश अवघ्या काही गुणांमुळे थोडक्यात हुकला आहे. 

आशियातला दुसरा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आता मध्य सामर्थ्यशाली देशांच्या यादीत झाल्याचं लोवी इन्स्टिट्यूटनं अहवालात म्हटलं आहे. 'येत्या काही वर्षांमध्ये भारताचा समावेश पुन्हा सामर्थ्यशाली देशांच्या यादीत होऊ शकेल. इंडो पॅसिफिक क्षेत्रात येणारा भारत कोरोनामुळे आपली विकासाची क्षमता हरवून बसला आहे,' असं लोवी इन्स्टिट्यूनं अहवालात नमूद केलं आहे.

चीनच्या तुलनेत भारत पिछाडीवर
'भारत आणि चीनची लोकसंख्या जवळपास समान आहे. काही वर्षांनी भारत लोकसंख्येत चीनला मागे टाकू शकेल. पण कोरोना संकटामुळे भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. या वर्षाच्या अखेरपर्यंत भारत, चीनचे एकूण आर्थिक उत्पादन केवळ ४० टक्क्यांपर्यंत पोहोचेल,' असं लोवी इन्स्टिट्यूनं अहवालात म्हटलं आहे.
 

Web Title: india out from worlds powerful country list due to coronavirus crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.