भारत-पाक शांतता चर्चा उधळण्याचा प्रयत्न -असिफ

By admin | Published: January 7, 2016 12:01 AM2016-01-07T00:01:53+5:302016-01-07T00:01:53+5:30

पाकिस्तान आणि भारत यांच्यातील नियोजित शांतता बोलणी दहशतवादी कारवायांद्वारे उधळून लावण्याचा प्रयत्न ‘काही तत्त्वे’ करीत असल्याचे पाकिस्तानचे

India-Pakistan peace talks try to overthrow - Asif | भारत-पाक शांतता चर्चा उधळण्याचा प्रयत्न -असिफ

भारत-पाक शांतता चर्चा उधळण्याचा प्रयत्न -असिफ

Next

इस्लामाबाद : पाकिस्तान आणि भारत यांच्यातील नियोजित शांतता बोलणी दहशतवादी कारवायांद्वारे उधळून लावण्याचा प्रयत्न ‘काही तत्त्वे’ करीत असल्याचे पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वॉजा मुहम्मद असिफ यांनी म्हटले. दहशतवाद्यांचे हे अत्यंत दुष्ट हेतू कधीही यशस्वी होणार नाहीत, असाही दावा त्यांनी केला.
‘‘पंतप्रधान शरीफ आणि मोदी यांनी दूरध्वनीवरील संभाषणात अशा प्रकारच्या दहशतवादी हल्ल्यांना उभय देशांतील सलोख्याचे संबंध हेच योग्य उत्तर असल्याचे म्हटले’’, असे असिफ म्हणाल्याचे रेडिओ पाकिस्तानने बुधवारी वृत्त दिले. पठाणकोट येथील हवाईतळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांबद्दल भारताने पाकिस्तानवर कोणताही आरोप केलेला नाही, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

Web Title: India-Pakistan peace talks try to overthrow - Asif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.