मोदींमुळेच भारत-पाक संबंध बिघडले - अझीझ
By admin | Published: October 9, 2016 02:27 PM2016-10-09T14:27:16+5:302016-10-09T15:49:02+5:30
मोदी यांच्या कार्यकाळात भारत आणि पाकीस्तान यांच्यामधील संबंध सुधारण्याची, सुरळीत होण्याची कोणतीही आशा उरलेली नाही असे
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. ९ - भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिक बिघडवण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचा आरोप करून मोदी यांच्या कार्यकाळात भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील संबंध सुधारण्याची कोणतीही आशा उरलेली नाही, असे पाकिस्तानमधील परराष्ट्र धोरणविषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांमधील व्यापारावर परिणाम होणार नसेल भारत पाकिस्तान सीमा सील करण्यात काहीच गैर नाही, असेही ते म्हणाले आहेत.
भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाला पाकिस्तानच्या कुरापती कारणीभूत नाहीत; तर भारताचे वर्चस्ववादी धोरण कारणीभूत आहे, असा आरोप अझीझ यांनी केला. ते म्हणाले, दक्षिण आशियाचे नेतृत्व करण्याच्या सत्ताकांक्षेने भारत या क्षेत्रात मुजोरी करीत असून ती पाकिस्तान सहन करणार नाही. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्र धोरणविषयक सल्लागार सरताज अझीझ यांनी एका स्थानिक प्रसारमाध्यमाला मुलाखत दिली. यामध्ये अझीझ यांनी भारत आणि नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.