सहा देशांकडून भारताची प्रशंसा....
By Admin | Published: March 15, 2015 12:07 AM2015-03-15T00:07:48+5:302015-03-15T00:07:48+5:30
सहा प्रमुख देशांकडून भारताची प्रशंसा, १४ मार्च २०१५
स ा प्रमुख देशांकडून भारताची प्रशंसा, १४ मार्च २०१५भारताची समर्थ वाटचाल जगासाठी हितावाहसहा प्रमुख देशांच्या राजदूतांनी केली भारताच्या प्रगतीची प्रशंसानवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्याकामी करण्यात आलेल्या भरकस प्रयत्नांबद्दल सहा प्रमुख देशांच्या राजदूतांनी भारताच्या नवीन सरकारची प्रशंसा केली आहे. एक महत्त्वाची भारत शक्ती म्हणून पुढे येणे; जगाच्या दृष्टीने चांगले आहे, असेही अमेरिका, जपान, चीन, ब्रिटन, जर्मनी आणि कॅनडा या देशांच्या राजूदतांनी आवर्जुन नमूद केले आहे.दहशतवाद, हवामानातील बदलासह जगापुढील आव्हांनाचा मुकाबला करण्यात भारतची भूमिका महत्त्वाची आहे. व्यापार आणि आर्थिक क्षेत्राच्यादृष्टीनेभारतात मुबलक क्षमता आहे, अशा शब्दांत राजदूत आणि उच्चायुक्तांनी भारताच्या प्रगतीची प्रशंसा केली आहे.अमेरिका आणि भारतादरम्यानची रणनीतिक भागीदारी परिपक्व होत नव्या टप्प्यात पोहोचली आहे. अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीने तर अनेक मुद्यांवरील कोंडी फुटली आहे. भारत आणि अमेरिकेने परस्पर सहकार्याने एकत्रित काम केल्यास जागतिक शांतता, लोकशाही आणि आर्थिक समृद्धीवर सकारात्मक परिणाम होईल, असे अमेरिकेचे राजदूत रिचर्ड वर्मा यांनी म्हटले आहे. इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये ते बोलत होते.मेक इन इंडियासह स्मार्ट सिटीसह विविध प्रकल्पांना चीनमध्ये व्यापक पाठिंबा मिळाला आहे. यासाठी भारतासोबत सक्रिय होत काम करण्याची चीनची इच्छा आहे, असे चीनचे राजदूत लू यूचेंग म्हणाले.जपानी उद्योगांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार भारत येत्या तीन वर्षात गुंतवणुकीच्या दृष्टीने सवार्ेत्कृष्ठ ठिकाण म्हणून नावारुपास येईल, असे जपानचे राजदूत ताकेशी यागी यांनी सांगितले.समर्थ आणि सक्रिय भारत प्रत्येकासाठी हितावह आहे. उदयोन्मुख अर्थव्यवस्था म्हणूनच नव्हेंतर हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या आव्हानाचा मुकाबला करण्याकामी भारताला महत्त्वाची भूमिका पार पाडायची आहे, अशा शब्दात ब्रिटनचे उच्चायुक्त जेम्स बेव्हन यांनी भारताचे महत्त्व अधोरेखित केले. बलात्काराच्या घटनांबाबत कोणीही तटस्थ राहू शकत नाही. ब्रिटनही भारताप्रमाणेमहिलाविरोधी अत्याचाराचा लढा देत आहे.जगापुढील आव्हांनावर मात करण्याकामी भारताची भूमिका महत्त्वपूर्ण असेल, असे कॅनडाचे उच्चायुक्त नादीर पटेल म्हणाले. ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त पॅट्रीक सक्लींग यांनीही जगाच्या वाटचालीतील भारताचे महत्त्व स्पष्ट केले.