भारतीयाला १ लाख युरोचा पुरस्कार

By admin | Published: June 10, 2016 04:41 AM2016-06-10T04:41:14+5:302016-06-10T04:41:14+5:30

शर्मा यांना त्यांची दुसरी कादंबरी ‘फॅमिली लाइफ’साठी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय डब्लीन साहित्य पुरस्कार घोषित झाला

India receives 1 million euro prize | भारतीयाला १ लाख युरोचा पुरस्कार

भारतीयाला १ लाख युरोचा पुरस्कार

Next


लंडन : भारतीय अमेरिकी लेखक अखिल शर्मा यांना त्यांची दुसरी कादंबरी ‘फॅमिली लाइफ’साठी प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय डब्लीन साहित्य पुरस्कार घोषित झाला असून, एक लाख युरो, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. आयर्लंडकडून हा पुरस्कार दिला जातो. कादंबरीसाठी दिला जाणारा हा जगातील सर्वाधिक रकमेचा पुरस्कार आहे.
दिल्लीत जन्मलेले शर्मा न्यूयॉर्कमध्ये वास्तव्याला आहेत. त्यांना त्यांच्या आत्मकथेसाठी २०१५ मध्ये ४० हजार पौंडांचा फोलियो पुरस्कार मिळाला होता. डब्लिन पुरस्कारासाठी १६० नामांकने आली होती. त्यातून शर्मा यांच्या कादंबरीची निवड करण्यात आली. ‘फॅमिली लाइफ’ ही कादंबरी लिहिण्यासाठी शर्मा यांना १३ वर्षे लागली. पुरस्कारातील रकमेतून भावाच्या नावे शिष्यवृत्ती सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: India receives 1 million euro prize

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.