संघर्ष टाळण्यासाठी भारताने हटावे - चीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 01:56 AM2017-08-08T01:56:36+5:302017-08-08T01:56:42+5:30

संघर्ष टाळण्यासाठी भारतीय सैन्याने चीनच्या भूभागावरुन मागे हटावे, असा इशारा पीपल्स लिबरेशन आर्मीचे वरिष्ठ कर्नल ली ली यांनी दिला आहे. भारताच्या बाजूने काय पाऊले उचलली जातात त्यावर आमची भूमिका ठरलेली असेल.

India to remove conflicts - China | संघर्ष टाळण्यासाठी भारताने हटावे - चीन

संघर्ष टाळण्यासाठी भारताने हटावे - चीन

Next

हुऐरो (चीन) : संघर्ष टाळण्यासाठी भारतीय सैन्याने चीनच्या भूभागावरुन मागे हटावे, असा इशारा पीपल्स लिबरेशन आर्मीचे वरिष्ठ कर्नल ली ली यांनी दिला आहे. भारताच्या बाजूने काय पाऊले उचलली जातात त्यावर आमची भूमिका ठरलेली असेल. गरज असेल तेव्हा योग्य कारवाई करु, असेही त्यांनी स्पष्ट केले.
चीन सरकारच्या पुढाकाराने भारतीय पत्रकार या भागात दौºयावर आहेत. कर्नल ली यांनी दावा केला की, भारतीय सैन्याने चीनच्या भूभागावर आक्रमण केले आहे. बीजिंगच्या बाहेरच्या भागातील सैन्याच्या एका छावणीवर भारतीय पत्रकारांना नेण्यात आले होते. त्यांच्याशी बोलताना ली म्हणाले की, चीनचे सैनिक काय विचार करतात यावर आपण रिपोर्ट करु शकता. मी एक सैनिक आहे. राष्ट्रीय अखंडतेच्या सुरक्षेसाठी सर्व काही करण्याचा प्रयत्न मी करेल. या दौºयात भारतीय पत्रकारांसमोर पीएलएने युद्धकौशल्याचा सरावही केला.
या सरावात छोट्या हत्यारांनी लक्ष्य साधणे, समोरासमोरच्या लढाईत शत्रंूच्या सैन्याला पकडणे, पायदळ पथकांचे प्रशिक्षण यांचा यात समावेश होता. ली यांनी हे स्पष्ट केले की, या प्रात्यक्षिकांचा आणि डोकलाम येथील सद्यस्थिती यांचा काही संबंध नाही. चीनच्या म्हणण्यानुसार ४८ भारतीय सैनिक डोकलाममध्ये पाय रोवून उभे आहेत.
चीनच्या विदेश मंत्रालयाने यापूर्वीच असा दावा केला आहे की, सिमेवर भारतीय सशस्त्र दलाचे जवान मोठ्या प्रमाणावर तैनात आहेत. आम्ही सीपीसी (चीनची कम्युनिस्ट पार्टी) आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्वातील २३ लाख सैनिकांच्या कमिशनच्या आदेशाचे पालन करु. ही छावणी पीएलए अधिकारी आणि कर्मचाºयांच्या सर्वात जुन्या आणि प्रमुख प्रशिक्षण केंद्रांपैकी एक आहे. चीनच्या राजधानीची सुरक्षा त्यांच्यावर सोपविलेली आहे. या छावणीत अंदाजे ११ हजार सैनिक असतात.
चीनच्या सरकारी मीडियाकडून भारताचा तिरस्कार करण्याचे काम सातत्याने सुरु आहे. चाइना डेलीने प्रकाशित केलेल्या एका लेखात म्हटले आहे की, भारताच्या घुसखोरीमागे चुकीचे भूगर्भशास्त्रविषयक आकलन आहे. आपल्या भूभागाच्या संरक्षणसााठी जे काही उपाय आवश्यक वाटतील ते करण्याचा कायदेशीर अधिकार चीनला आहे. भारत आणि चीन यांच्यात डोकलाम भागात १६ जूनपासून तणाव आहे.

चीन मोठे वा छोटे युद्ध करणारच नाही

नवी दिल्ली : डोकलाममध्ये निर्माण झालेल्या संघर्षावरुन चीनकडून वारंवार युद्धाची भाषा केली जात असली, तरी चीन मर्यादित स्वरूपाच्या लढाईचे पाऊलही उचलणार नाही, असा विश्वास भारतीय सुरक्षा यंत्रणांना आहे. डोकलाममधून भारत व चीनने सैन्य मागे घेणे, हाच दोन्ही देशांसाठी उत्तम पर्याय आहे, असे सुरक्षा यंत्रणांमधील सूत्रांनी सांगितले.

सिक्किम-भूतान-तिबेट या ट्राय जंक्शनजवळ रस्तेबांधणीच्या चीनच्या हट्टामुळे हा संघर्ष सुरू आहे. चीनने आगळीक केलीच वा युद्धाची परिस्थिती उद्भवली, तर आम्ही उत्तर देण्यासाठी सज्ज आहे असे सुरक्षा दलातील सूत्रांनी सांगितले.

चीन डोकलाममध्ये भारताविरुद्ध लष्करी आॅपरेशन करू शकते, असे शांघाय अ‍ॅकॅडमी आॅफ सोशल सायन्सेसमधील आंतरराष्ट्रीय विषयांच्या अभ्यासकांचे म्हणणे आहे. भारताची उक्ती व कृतीमध्ये खूपच अंतर आहे, असे सेंटर फॉर एशिया-पॅसिफिक स्टडी सेंटरचे संचालक जाओ गेनचेंग यांनीही म्हटले आहे. 

Web Title: India to remove conflicts - China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.