पाकिस्तानातील हल्ल्याला भारत जबाबदार, पाकच्या माजी मंत्र्याची मुक्ताफळे
By admin | Published: January 21, 2016 10:28 AM2016-01-21T10:28:52+5:302016-01-21T13:15:29+5:30
बादशहा खान विद्यापीठावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी भारत जबाबदार आहे असा जावई शोध पाकिस्तानचे माजी अंतर्गत गृहमंत्री रेहमान मलिक यांनी लावला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. २१ - खैबर पख्तुनवा प्रांतातील चारसद्दा येथील प्रसिध्द बादशहा खान विद्यापीठावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी भारत जबाबदार आहे असा जावई शोध पाकिस्तानचे माजी अंतर्गत गृहमंत्री रेहमान मलिक यांनी लावला आहे.
आधी पाकिस्तान तालिबान संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती नंतर मात्र त्यांनी आपण या हल्ल्यामागे नसल्याचे म्हटले होते. या हल्ल्यात विद्यार्थी, शिक्षकांसह २५ जण ठार झाले. भारताच्या संरक्षण मंत्र्यांनी दिलेल्या धमकीला आपण गांर्भीयाने घ्यायला हवे होते. बादशहा खान विद्यापीठावर झालेल्या हल्ल्यामागे भारतीय गुप्तचर यंत्रणा 'रॉ' चा हात आहे. त्यांचा तेहरीक-ए-तालिबानबरोबर समझोता झाला आहे अशी मुक्ताफळे पाकिस्तानचे माजी अंतर्गत गृहमंत्री राहिलेल्या रेहमान मलिक यांनी पाकिस्तानी वृत्तवाहिनीशी बोलताना उधळली.
मलिक यांनी पठाणकोट दहशतवादी हल्ल्यासाठी जैश-ए-मोहम्मदलाही क्लीनचीट दिली. पठाणकोट येथे झालेला दहशतवादी हल्ला जैश-ए-मोहम्मदने घडवलेला नाही. भारतातल्याच लोकांनी हा हल्ला घडवून आणला. भारत-पाकिस्तानमध्ये संबंध सुधारावेत अशी रॉ ची इच्छा नाही असे मलिक म्हणाले.