भारताचा वाढता दबदबा! जयशंकर यांना भेटण्यासाठी व्लादिमीर पुतिन यांनी तोडला प्रोटोकॉल...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 03:20 PM2023-12-28T15:20:11+5:302023-12-28T15:21:15+5:30
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर रशिया दौऱ्यावर गेले असून, यावेळी दोन्ही देशांमध्ये अनेक करार करण्यात आले आहेत.
India Russia Relation:भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकररशिया दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. सध्या या भेटीची जोरदार चर्चा सुरू आहे. याचे कारण म्हणजे, पुतिन नेहमी त्यांच्या समकक्ष राष्ट्रप्रमुखांना भेटतात. पण, भारतासोबतच्या संबंधांमुळे पुतिन यांनी प्रोटोकॉल मोडून जयशंकर यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, यापूर्वी त्यांनी भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासाठीही प्रोटोकॉल मोडला होता.
#WATCH | Moscow: Russian President Vladimir Putin says, "Despite all the turmoil happening worldwide, the relationship with our true friends in Asia-India has been progressing incrementally...Regarding the situation in Ukraine, many times I advised him of how things have been… pic.twitter.com/5z2RBf8Ogz
— ANI (@ANI) December 27, 2023
रशिया आणि भारताचे मैत्रिचे संबंध फार जुने आहेत. तसेच, 2022 मध्ये रशिया-युक्रेन संघर्ष सुरू झाल्यानंतर पाश्चात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले, पण भारत रशियाच्या बाजुने उभा राहिला. क्वादिमीर पुतिन आणि पीएम नरेंद्र मोदी यांची मैत्री सर्वांनाच परिचित आहे. ाता पुतिन भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांनाही खूप महत्त्व देत आहेत.
जयशंकर यांच्या रशिया दौऱ्यातून काय साध्य झाले
आधुनिक लष्करी शस्त्रांच्या उत्पादनात प्रगती झाली आहे. आता भारत आणि रशिया संयुक्तपणे लष्करी शस्त्रे तयार करणार आहे. दरम्यान, पुतिन यांच्यासोबतच्या बैठकीत जयशंकर म्हणाले की, भारत आणि रशियामधील व्यापारी उलाढाल यावर्षी 50 अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. या दौऱ्यात कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या विस्ताराबाबत दोन्ही देशांनी करारावर स्वाक्षरी केली आहे. कुडनकुलम हा भारतातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प आहे. याशिवाय औषधे, औषधी द्रव्ये आणि वैद्यकीय उपकरणे यांच्याबाबतही सामंजस्य करार करण्यात आला आहे.