अमेरिकेकडून सबमरीन भेदी हेलिकॉप्टर खरेदी करणार भारत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 03:28 PM2018-11-17T15:28:00+5:302018-11-17T15:28:51+5:30
भारत अमेरिकेकडून 24 अँटी सबमरीन हेलिकॉप्टर 'रोमियो' खरेदी करणार आहे.
वॉशिंग्टन- भारत अमेरिकेकडून 24 अँटी सबमरीन हेलिकॉप्टर 'रोमियो' खरेदी करणार आहे. या हेलिकॉप्टरची किंमत 2 बिलियन अमेरिकी डॉलर सांगितली जातेय. संरक्षण मंत्रालयाच्या विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळाली आहे. भारताला गेल्या 10 वर्षांपासून अँटी सबमरीन हेलिकॉप्टरची गजर आहे.
येत्या काही महिन्यात या करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या होऊ शकतात. अमेरिकेचे उपराष्ट्रपती माइक पेंस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सिंगापूरमध्ये भेट घेतली होती. भारतानं अमेरिकेच्या या हेलिकॉप्टर्ससाठी एक पत्र लिहिलं आहे, ज्यात 24 हेलिकॉप्टरची मागणी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच भारत आणि अमेरिकेमध्ये संरक्षण करारावर चर्चा झाली आहे. पेंस आणि मोदींच्या भेटीतही भारत आणि अमेरिकेतल्या द्विपक्षीय संरक्षण संबंधांवर चर्चा झाली होती.
अर्जेटिंनामध्ये जी-20 समीटमध्ये मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुलाखतीपूर्वीच पेंस आणि मोदींची झालेली भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. परंतु अद्यापही याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, भारत अशा प्रकारेच 123 हेलिकॉप्टर भारतात बनवणार आहे. सध्या तरी हे हेलिकॉप्टर फक्त अमेरिकेकडे आहे. जे जगभरात सर्वात अत्याधुनिक अँटी सबमरीन हेलिकॉप्टर आहेत. या हेलिकॉप्टरच्या मदतीनं पाणबुडीला उद्ध्वस्त करता येणार आहे.