"जागतिक महासत्तांच्या यादीत भारत हवा", व्लादिमीर पुतिन यांचं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 07:30 AM2024-11-09T07:30:35+5:302024-11-09T07:30:59+5:30
Vladimir Putin News: भारताची अर्थव्यवस्था इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत वेगाने आहे. वाढत त्यामुळे महासत्तांच्या जागतिक यादीत भारताचा समावेश व्हायला हवा, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले आहे.
मॉस्को - भारताची अर्थव्यवस्था इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत वेगाने आहे. वाढत त्यामुळे महासत्तांच्या जागतिक यादीत भारताचा समावेश व्हायला हवा, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले आहे. सोची येथील वाल्डाई डिस्कशन क्लबने गुरुवारी आयोजिलेल्या कार्यक्रमात पुतिन म्हणाले की, रशिया भारतासोबत सर्वच क्षेत्रांत संबंध अधिक दृढ करत आहे. भारताची लोकसंख्या सव्वा अब्ज आहे. त्या देशाला प्राचीन संस्कृतीचा वारसा आहे.
तसेच भविष्यकाळही उत्तम आहे. या सर्व गोष्टी पाहाता जागतिक महासत्तांच्या यादीत भारताचा समावेश व्हायला हवा. भारत आर्थिक विकासात आघाडीवर आहे. दोन्ही देशांतील सहकार्यात दरवर्षी वाढच होत आहे, याकडेही व्लादिमिर पुतिन यांनी लक्ष वेधले.
भारत-चीन मतभेदांवर तोडगा नक्की शोधतील रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले की, भारत व चीनमध्ये काही मुद्द्यांबाबत मतभेद आहेत. पण त्यावर तोडगा काढण्यासाठी या दोन्ही देशांचे प्रयत्न सुरू आहेत व ते त्यात नक्की यशस्वी होतील.