भारताने विकासावर लक्ष केंद्रित करावे - चिनी मीडिया

By admin | Published: April 24, 2017 07:01 PM2017-04-24T19:01:34+5:302017-04-24T19:07:14+5:30

चीनच्या प्रभावास चाप लावण्याकरता हिंदी महासागरात विमानवाहू नौका बांधण्यापेक्षा भारताने आपल्या आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करावे.

India should focus on development - Chinese media | भारताने विकासावर लक्ष केंद्रित करावे - चिनी मीडिया

भारताने विकासावर लक्ष केंद्रित करावे - चिनी मीडिया

Next

ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 24 - चीनच्या प्रभावास चाप लावण्याकरता हिंदी महासागरात विमानवाहू नौका बांधण्यापेक्षा भारताने आपल्या आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करावे. असा सल्ला चिनी माध्यमांने भारताला दिला आहे. भारत सध्या औद्योगिकीकरणाच्या पहिल्या टप्प्यामध्ये आहे. अशा वेळी भारताला अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. भारताला विमानवाहू नौका बांधताना अनेक अडथळे येऊ शकतात. असा सल्ला ग्लोबल टाईम्स या चीनमधील सरकारी वृत्तपत्राच्या माध्यमामधून देण्यात आला आहे. तसेच विमानवाहू नौकेच्या बांधणीसंदर्भातील नकारात्मक उदाहरण म्हणून भारताकडे पहावयास हरकत नाही, अशी उपाहासात्मक टीकाही चीनने भारतावर केली आहे.
ग्लोबल टाईम्समध्ये असलेल्या लेखामध्ये भारताला खडे बोल सुनावले आहेत. या लेखाद्वारे एकप्रकारे भारताला सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच काही सूचना करण्यात आल्या आहेत. भारत आणि चीन या दोन्ही देशांनी विमानवाहू नौका बांधण्यासंदर्भात दोन वेगवेगळे मार्ग स्वीकारले. मात्र दोन्ही देशांच्या प्रगतीमधील फरकामधून आर्थिक विकासाचे महत्व स्पष्ट होते. तेव्हा हिंदी महासागरामधील चीनचा वाढता प्रभाव रोखण्याकरिता विमानवाहू नौका बांधण्याच्या मोहिमेस गती देण्यापेक्षा भारताने आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करावयास हवे. असेही सांगण्यात आले आहे.
जगातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेल्या चीनकडे आता व्यूहात्मक हिताच्या संरक्षणासाठी बलिष्ठ नौदल बांधण्याची क्षमता आहे. चीनकडून निर्मिती करण्यात आलेली पहिली विमानवाहू नौका हे चीनच्या आर्थिक विकासाचे फळ आहे. असेही सांगण्यात आले आहे.

Web Title: India should focus on development - Chinese media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.