भारताने पाकच्या संयमाची परीक्षा घेऊ नये - मुशर्रफ

By admin | Published: October 5, 2014 12:11 PM2014-10-05T12:11:49+5:302014-10-05T12:11:58+5:30

सीमारेषेवर पाकिस्तान सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असतानाच पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी शस्त्रसंधींच्या उल्लंघनासाठी भारतालाच जबबादार ठरवले आहे.

India should not take the patience of Pakistan - Musharraf | भारताने पाकच्या संयमाची परीक्षा घेऊ नये - मुशर्रफ

भारताने पाकच्या संयमाची परीक्षा घेऊ नये - मुशर्रफ

Next

ऑनलाइन लोकमत

कराची, दि. ५ -  सीमारेषेवर पाकिस्तान सैन्याकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत असतानाच  पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी शस्त्रसंधींच्या उल्लंघनासाठी भारतालाच जबबादार ठरवले आहे. भारताने पाकिस्तानच्या संयमाची परीक्षा घेऊ नये असे मुशर्रफ यांनी म्हटले आहे. तर मुशर्रफ यांना सध्या पाकिस्तानमध्येच कोणी गांभीर्याने घेत नसल्याने त्यांच्या विधानावर प्रतिक्रीया देणार नाही असा सणसणीत टोला भारताचे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी लगावला आहे. 
देशद्रोहाचा खटला सुरु असलेले पाकचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी पुन्हा एकदा भारतविरोधी वक्तव्य करुन राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. मुशर्रफ म्हणाले, नियंत्रण रेषेवर भारताकडून होणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन हे दोन्ही देशांसाठी चांगले नाही. भारताने आमच्या सैन्याच्या संयमाची परीक्षा घेऊ नये. तर पाकिस्तानमधील सध्याच्या राजकीय परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केले आहे. पाकमधील सर्व राजकीय पक्षांनी चर्चा करुन लोकशाही पद्धतीने स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत असे मुशर्रफ यांनी म्हटले आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाकने वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून १९७१ च्या युद्धानंतर पाकने पहिल्यांदाच ऐवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचे भारतीय सैन्याच्या अधिका-यांनी सांगितले.

Web Title: India should not take the patience of Pakistan - Musharraf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.