PoK सोडा, दहशतवाद आणि अत्याचार थांबवा; पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत भारताने सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 09:27 AM2023-09-23T09:27:59+5:302023-09-23T09:28:58+5:30

भारताने दहशतवाद थांबवण्यास, जम्मू-काश्मीरचा ताब्यात असलेला (PoK) भाग रिकामा करण्यास आणि अल्पसंख्याक लोकांवर होणारे अत्याचार थांबवण्यास सांगितले आहे.

india slams pakistan in united nation general assembly unga says vacate pok demands action on terrorism | PoK सोडा, दहशतवाद आणि अत्याचार थांबवा; पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत भारताने सुनावले

PoK सोडा, दहशतवाद आणि अत्याचार थांबवा; पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत भारताने सुनावले

googlenewsNext

जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे भारताने संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानला स्पष्टपणे सांगितले. भारताने म्हटले आहे की, तांत्रिक गुंतागुंतीत अडकण्याऐवजी पाकिस्तानने मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषींवर विश्वासार्ह आणि सत्यापित कारवाई करावी. दहशतवादी हल्ल्याच्या १५ वर्षांनंतरही भारत न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. याशिवाय, दक्षिण आशियातील शांततेसाठी भारताने पाकिस्तानला तीन सल्ले दिले. भारताने दहशतवाद थांबवण्यास, जम्मू-काश्मीरचा ताब्यात असलेला (PoK) भाग रिकामा करण्यास आणि अल्पसंख्याक लोकांवर होणारे अत्याचार थांबवण्यास सांगितले आहे.

भारताकडून डिप्लोमेट पेटल गेहलोत यांनी पाकिस्तानला ताब्यात असलेला म्हणजेच पीओके परिसर रिकामा करण्यास सांगितले. केंद्रशासित प्रदेशाच्या ताब्यातील क्षेत्र रिकामे करण्यासोबतच दहशतवादाविरोधात कारवाई करण्यात यावी, असे भारताने म्हटले आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपींना शिक्षा करण्याचे आवाहन त्यांनी केले. याआधीही पाकिस्तानने भारताविरोधात गरळ ओकली होती. यावर भारताने म्हटले की, पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांच्या व्यासपीठाचा गैरवापर करतो.

दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान अन्वर उल हक काकड यांनी काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडण्याचे धाडस दाखवले. पाकिस्तानला आपल्या शेजाऱ्यांसोबत शांततापूर्ण आणि मजबूत संबंध हवे आहेत, असा दावा अन्वर उल हक काकड यांनी केला. पाकिस्तानचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणाले की, पाकिस्तानला भारतासह सर्व शेजारी राष्ट्रांशी शांततापूर्ण आणि मजबूत संबंध हवे आहेत. काश्मीर ही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शांततेची गुरुकिल्ली आहे. जम्मू आणि काश्मीरचा मुद्दा हा संयुक्त राष्ट्रांच्या अजेंड्यावरील प्रदीर्घ काळापासून कायम असलेला मुद्दा आहे.

भारताच्यावतीने पेटल गेहलोत यांनी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत आपले मत मांडले. त्यांनीही पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. भारताने पाकिस्तानला मानवाधिकार सुधारण्याचा सल्लाही दिला. पेटल गेहलोत यांनी सांगितले की, पाकिस्तानने इतरांकडे बोटे दाखवण्याऐवजी मानवी हक्कांची नोंद सुधारली तर बरे होईल. अल्पसंख्याक आणि महिलांवर दररोज अत्याचार होत आहेत. पाकिस्तानमध्ये भूतकाळात ख्रिश्चन समुदायावर क्रूरता दिसून आली, त्याठिकाणी एकूण १९ चर्च जाळले गेल्या आणि ८९ ख्रिश्चन घरे जाळली गेली. पाकिस्तानातील अल्पसंख्याक समाजातील महिलांची, विशेषत: हिंदू, शीख आणि ख्रिश्चनांची स्थिती दयनीय आहे.

Web Title: india slams pakistan in united nation general assembly unga says vacate pok demands action on terrorism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.