"भारताने बदला घेतला...", इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींवर पाकिस्तान नाराज; नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 12:56 IST2025-01-28T12:54:08+5:302025-01-28T12:56:55+5:30

इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्राबोवो सुबिअंतो २६ जानेवारी रोजी भारतात प्रजासत्ताक दिनानिमित्त आले होते.

India took revenge Pakistan is angry with the President of Indonesia What is the real reason? | "भारताने बदला घेतला...", इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींवर पाकिस्तान नाराज; नेमकं कारण काय?

"भारताने बदला घेतला...", इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींवर पाकिस्तान नाराज; नेमकं कारण काय?

२६ जानेवारी रोजी दिल्लीत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. जगभरातील दिग्गज नेत्यांनी यावेळी उपस्थिती लावली. यावेळी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्राबोवो सुबिअंतो मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते. इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींचा आधीच दौरा ठरला होता. ते आधी भारतात येऊन नंतर २६ च्या सायंकाळी पाकिस्तानसाठी रवाना होणार होते. पण, त्यांनी अचानक दौऱ्यामध्ये मोठा बदल करुन पाकिस्तानला जाण्याचे रद्द केले. यावरुन आता पाकिस्तान भारतावर आरोप करत आहे. 

सावधान! तुमचे स्मार्ट वॉच ठरू शकते जीवघेणे; 'या' गंभीर आजारांचा धोका, धक्कादायक माहिती उघड

राष्ट्रपती प्राबोवो सुबिअंतो हे भारतातून २६ जानेवारी रोजी सायंकाळी पाकिस्तानसाठी रवाना होणार होते. पण, भारताला त्यांचा दिल्लीतून थेट पाकिस्तान दौरा आवडला नाही. भारताने त्यांच्यावर दबाव आणला यामुळे त्यांनी आपल्या दौऱ्यात बदल केले असल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला आहे.

इंडोनेशियाचे पंतप्रधान भारतातून थेट पाकिस्तानमध्ये न जाता आधी मलेशियाला जातील असा निर्णय त्यांच्याच सरकारने घेतला. दुसरीकडे पाकिस्तानला ते असा बदल करतील असा कोणताही अंदाज नव्हता. पाकिस्तानमध्ये त्यांच्या स्वागताची तयारी केली होती. पण, इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी अचानक दौरा रद्द केला. याच सर्व खापर पाकिस्तानने भारतावर फोडले आहे. शाहबाज सरकारकडून अजून कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही. पण, लोकांनी या पद्धतीच्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

पाकिस्तानी माध्यमात चर्चा

पाकिस्तानी माध्यमात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे. पाकिस्तानी युट्यूबर आरजू काझमी म्हणाले की, प्रजासत्ताक दिनासाठी भारताला दुसरा कोणताही पाहुणा मिळाला नाही. त्यांनी २६ जानेवारी रोजी इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींना आमंत्रित केले. तर पाकिस्तानच्या पंतप्रधानांनीही २६ जानेवारी रोजी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष इस्लामाबादला येणार असल्याची तयारी सुरू केली होती. त्यांनी सरकारी मंत्री एहसान इक्बाल यांच्यावर स्वागताची जबाबदारी दिली होती.

आरजू काजमी पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारला हे माहित असले पाहिजे की पाकिस्तानने इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींना आधीच फोन केला आहे. असे असूनही, नरेंद्र मोदी सरकारने इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांना जाणूनबुजून भारतात आमंत्रित केले.

"पाकिस्तानने पहिल्यां इंडोनोशियाच्या राष्ट्रपतींना बोलावले आहे हे नरेंद्र मोदी सरकारला माहित होते. असे असूनही नरेंद्र मोदी सरकारने इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांना जाणूनबुजून भारतात आमंत्रित केले, असा आरोप आरजू काजमी यांनी केला. 

आरजू काजमी म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारने इंडोनेशियन राष्ट्राध्यक्षांना व्यापाराच्या ऑफर देऊन आणि इतर अनेक प्रकारच्या ऑफर देऊन भारतात आणले असावे. इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षांनाही असा विचार आला असेल की पाकिस्तानपेक्षा भारतात जाण्यात जास्त फायदा आहे. तिथून तुम्हाला नक्कीच काहीतरी मिळेल. इंडोनेशियाचे राष्ट्रपती भारतानंतरही पाकिस्तानला जाऊ शकले असते, पण भारताने जाणूनबुजून त्यांना तसे करण्याची परवानगी दिली नाही, असा दावाही त्यांनी केला आहे. 

Web Title: India took revenge Pakistan is angry with the President of Indonesia What is the real reason?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.