भारत, ताजिकीस्तानची दहशतवादाविरुद्ध वज्रमूठ

By admin | Published: July 14, 2015 02:04 AM2015-07-14T02:04:42+5:302015-07-14T02:04:42+5:30

भारत व ताजिकिस्तानने दहशतवादविरोधी लढाईतील परस्पर सहकार्य वाढविण्याचा सोमवारी निर्धार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभय देश या धोक्याच्या

India, the tremors against Tajikistan's terrorism | भारत, ताजिकीस्तानची दहशतवादाविरुद्ध वज्रमूठ

भारत, ताजिकीस्तानची दहशतवादाविरुद्ध वज्रमूठ

Next

दुशाम्बे : भारत व ताजिकिस्तानने दहशतवादविरोधी लढाईतील परस्पर सहकार्य वाढविण्याचा सोमवारी निर्धार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभय देश या धोक्याच्या मुख्य स्रोताजवळ वसलेले असल्याचे सांगितले. त्यांचा अंगुलीनिर्देश पाकिस्तान व अफगाणिस्तानकडे होता.
मोदी आणि ताजिकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इमामअली रहमान यांच्या भेटीदरम्यान दोन्ही देशांत व्यापार आणि गुंतवणूक वाढविण्याखेरीज लष्करी संबंध बळकट करण्याबाबतही सहमती झाली.
सहा देशांच्या आठदिवसीय दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात येथे पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ताजिकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इमामअली रहमान यांची भेट घेतली. दोन्ही पक्षांनी विविध क्षेत्रांत संबंध नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प सोडला. उभय देशांनी संस्कृती आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात दोन करार केले. मोदी आणि रहमान यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण केले. (वृत्तसंस्था)

पाककडे दाखविले बोट
ताजिकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष रहमान यांच्या सोबतच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना मोदी पाकिस्तान, अफगाणिस्तान यांचे नाव न घेता म्हणाले की, आम्ही दहशतवादाच्या मुख्य स्रोतानिकट वसलेलो आहोत. दहशतवादाचा धोका वाढत असल्यामुळे आम्हीही आमचे परस्पर सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: India, the tremors against Tajikistan's terrorism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.