India Replay to Pakistan Shahbaz Sharif: शाहबाज शरीफांच्या काश्मीर प्रस्तावाला भारताचा जबरदस्त रिप्लाय; अमेरिकाही आली सोबत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 01:20 PM2022-04-12T13:20:53+5:302022-04-12T14:27:28+5:30

India-US 2+2 Dialogue: अमेरिका दौऱ्यावर असलेले भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना शुभेच्छा दिल्या आणि दहशतवादाच्या मुद्द्यावरुन खास संदेशही दिला.

India-US 2+2 Dialogue: Rajnath Singh's direct message to Pakistan's new Prime Minister on terrorism | India Replay to Pakistan Shahbaz Sharif: शाहबाज शरीफांच्या काश्मीर प्रस्तावाला भारताचा जबरदस्त रिप्लाय; अमेरिकाही आली सोबत

India Replay to Pakistan Shahbaz Sharif: शाहबाज शरीफांच्या काश्मीर प्रस्तावाला भारताचा जबरदस्त रिप्लाय; अमेरिकाही आली सोबत

Next

वॉशिंग्टन: पाकिस्तानमध्ये काल नवाज शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली. तत्पूर्वी त्यांनी मोदींना काश्मीरवर चर्चेचा प्रस्ताव देताना आम्ही काश्मीरींना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे म्हटले. तसेच भारताला पाकने कसे गुडघ्यावर टेकायला भाग पाडलेले, अशी शेखी मिरविली. यावर आता भारताने शरीफ यांना जबरदस्त उत्तर दिले आहे.

शाहबाज शरीफ यांना भारत आणि अमेरिकेने संदेश देताना म्हटले की, पाकिस्तानने आधी दहशतवाद्यांवर तात्काळ आणि कायमची कारवाई करावी, पाकिस्तानाच्या नियंत्रणात असलेल्या कोणत्याही भूभागाचा दहशतवादी हल्ल्यांसाठी वापर केला जाऊ नये, 26/11 आणि पठाणकोट हल्ल्यातील दोषींना न्यायालयाच्या कक्षेत आणण्यात यावे अशी मागणी केली आहे.

राजनाथ सिंह यांचा संदेश

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान शेहबाज शरीफ यांना दहशतवादाच्या मुद्द्यावरुन एक खास संदेश पाठवला आहे. राजनाथ सिंह म्हणाले, "मला पाकिस्तानच्या पंतप्रधानांना एवढेच म्हणायचे आहे की, त्यांनी दहशतवाद संपवण्याच्या दृष्टीने काम करावे. माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत."

2+2 चर्चेत दहशतवादाचा मुद्दा उपस्थित 
एएनआयशी बोलताना राजनाथ सिंह म्हणाले की, "हे स्पष्ट आहे की जेव्हाही द्विपक्षीय चर्चा होते, तेव्हा दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला जातो. अमेरिकेसोबतच्या 2+2 चर्चेदरम्यान आम्ही यावर चर्चा केली. अमेरिकेच्या बाजूने आश्वासनाचा प्रश्नच येत नाही, आम्ही फक्त चर्चा केली आहे."

संरक्षणमंत्र्यांचे आवाहन...
यावेळी संरक्षण मंत्र्यांनी अमेरिकन कंपन्यांना भारतात येऊन गुंतवणूक करण्याचे आणि 'मेक इन इंडिया' कार्यक्रमाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. राजनाथ सिंह म्हणाले की, आम्ही अमेरिकन कंपन्यांना उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये काम करण्यास आणि त्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यास सांगितले आहे.

भारत-अमेरिका मोठी संरक्षण भागीदारी महत्त्वाची 
भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधांसाठी मोठी संरक्षण भागीदारी महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले. एक मोठा देश, हिंद महासागराचे केंद्र आणि लोकशाही म्हणून भारताच्या 'ऍक्ट ईस्ट' आणि 'नेबरहुड फर्स्ट' धोरणाच्या विस्तृत हिंद पॅसिफिक आणि हिंदी महासागर क्षेत्रात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. पारंपारिक आणि उदयोन्मुख संरक्षण क्षेत्रात भारत आपली क्षमता दुप्पट करण्यासाठी अमेरिकेसोबत काम करत असल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. 

Web Title: India-US 2+2 Dialogue: Rajnath Singh's direct message to Pakistan's new Prime Minister on terrorism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.