मला खूश करण्यासाठीच व्यापार करार करू इच्छितो भारत- डोनाल्ड ट्रम्प
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 08:49 AM2018-10-02T08:49:52+5:302018-10-02T08:50:07+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी अमेरिकेच्या उत्पादनांवर लावलेल्या आयात शुल्कावरून भारतावर निशाणा साधला आहे.
वॉशिंग्टन- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी अमेरिकेच्या उत्पादनांवर लावलेल्या आयात शुल्कावरून भारतावर निशाणा साधला आहे. भारत अमेरिकेला खूश करण्यासाठीच व्यापार करार करू इच्छितो. ट्रम्प यांनी काही दिवसांच्या आतच दुस-यांदा अमेरिकी उत्पादनांवर लावल्या जाणा-या टॅक्सवरून हल्लाबोल केला आहे.
ट्रम्प यांनी भारताला 'टेरिफ किंग' असं संबोधलं आहे. भारता अमेकिरेच्या उत्पादनांवर जास्त कर लावतो आहे. तसेच आम्हीही भारतातून येणा-या उत्पादनांवर अशा प्रकारे टॅक्स लावू शकतो. त्यावेळी भारतानं अमेरिकेबरोबर व्यापार करार करायचं असल्याचं सांगितलं होतं. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना खूश करण्यासाठीच भारत व्यापार करार करू इच्छितो, असंही अमेरिकेच्या अधिका-यांनी सांगितलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते, अमेरिकेबरोबर व्यापार करार करण्यास भारत इच्छुक आहे.
India wants to start trade talks with US 'immediately', says US President Donald Trump: AFP pic.twitter.com/SMjTWVodGY
— ANI (@ANI) October 1, 2018