पळवलेल्या दुर्मिळ वस्तू भारताला परत मिळणार
By Admin | Published: April 2, 2015 11:58 PM2015-04-02T23:58:07+5:302015-04-02T23:58:07+5:30
भारतीय कलावस्तूंचा कुप्रसिद्ध व्यापारी सुभाष कपूर याने भारतातून चोरून होनोलुलू येथील संग्रहालयाला विकलेल्या सात दुर्मिळ मौल्यवान
न्यूयॉर्क : भारतीय कलावस्तूंचा कुप्रसिद्ध व्यापारी सुभाष कपूर याने भारतातून चोरून होनोलुलू येथील संग्रहालयाला विकलेल्या सात दुर्मिळ मौल्यवान वस्तू या संग्रहालयाने अमेरिकेला परत केल्या असून, त्या वस्तू अमेरिका भारताला परत करणार आहे.
होनोलुलू येथील संग्रहालयाने या सात दुर्मिळ वस्तू अमेरिकेच्या स्थलांतर अधिकाऱ्यांना व अंतर्गत सुरक्षा अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. या वस्तूंसंदर्भात चाललेल्या चौकशीत या वस्तू भारतातील मंदिरे व बुद्ध मंदिरांतून चोरून अवैध मार्गाने अमेरिकेत आणल्याचे स्पष्ट झाले. अमेरिकेचे स्थलांतर अधिकारी या वस्तू भारतात आणणार असून भारतीय अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करतील. या वस्तू दगडी असून त्या चोरीच्या असल्याची कल्पना वस्तुसंग्रहालयाला नव्हती. कपूरसंदर्भात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस काढली होती व त्याला २०११ साली जर्मनीत अटक झाली असून, भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. या दुर्मिळ वस्तू आॅपरेशन हिडन आयडॉल या मोहिमेंतर्गत शोधण्यात आल्या.(वृत्तसंस्था)