ट्रम्प प्रशासनाने महत्वाच्या पदावरुन हटवले भारतीय वंशाच्या अधिका-याला
By admin | Published: April 22, 2017 07:16 PM2017-04-22T19:16:48+5:302017-04-22T19:18:14+5:30
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रशासनात मोठया प्रमाणावर फेरबदल केले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 22 - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रशासनात मोठया प्रमाणावर फेरबदल केले आहेत. महत्वाच्या पदांवरुन अनेकांची उचलबांगडी केली आहे. आता भारतीय अमेरिकन वंशाचे डॉक्टर विवेक मुर्ती यांना सर्जन जनरल पदावरुन हटवले आहे.
ट्रम्प प्रशासनाने विवेक मुर्ती यांना सर्जन जनरल पदाचा राजीनामा देण्यास सांगितला आहे. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मुर्ती यांची सर्जन जनरल पदावर नियुक्ती केली होती. या पदावर नियुक्तीचा मान मिळवणारे ते पहिले भारतीय-अमेरिकन नागरीक होते.
सर्जन जनरल पदावरुन हटवले असले तरी, मुर्ती यांना अमेरिकेच्या कमिशन्ड कॉर्प्सच्या सदस्यसदस्यपदी कायम ठेवण्यात आले आहे. डिसेंबर 2014 मध्ये त्यांची नियुक्ती झाली होती. विवेक मुर्ती अमेरिकेचे 19 वे तर पहिले भारतीय-अमेरिकन सर्जन जनरल होते.