काबुलवरून १२० भारतीयांना घेऊन आलं हवाई दलाचं विमान; प्रवाशांनी दिल्या 'भारत माता की जय'च्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 02:30 PM2021-08-17T14:30:20+5:302021-08-17T14:34:29+5:30

Afghanistan Taliban Crisis : मंगळवारी सकाळी हवाई दलाचं C-17 हे विमान काबुलवरून जामनगरसाठी रवाना झालं होतं. यात भारतीय दुतावासाचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि काही भारतीय पत्रकारही होते.

indian airforce Plane carrying 120 Indians from afghanistan Kabul taliban chanted Bharat Mata Ki Jai in india | काबुलवरून १२० भारतीयांना घेऊन आलं हवाई दलाचं विमान; प्रवाशांनी दिल्या 'भारत माता की जय'च्या घोषणा

काबुलवरून १२० भारतीयांना घेऊन आलं हवाई दलाचं विमान; प्रवाशांनी दिल्या 'भारत माता की जय'च्या घोषणा

googlenewsNext
ठळक मुद्देमंगळवारी सकाळी हवाई दलाचं C-17 हे विमान काबुलवरून जामनगरसाठी रवाना झालं होतं.यात भारतीय दुतावासाचे कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि काही भारतीय पत्रकारही होते.

रविवारी तालिबाननंअफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर बिघडलेली परिस्तिती पाहता भारतानं त्या ठिकाणी असलेल्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यास सुरूवात केली होती. मंगळवारी सकाळी भारतीय हवाई दलाचं विमान जवळपास १२० भारतीयांना काबुलवरून जामनगर येथे घेऊन आलं. महत्त्वाची बाब ही की अफगाणिस्तानमधील भारताचे राजदुत रुद्रेंद्र टंडन हेदेखील भारतात परतले आहेत. हवाई दलाचं C-17 हे विमान जामनगर येथे उतरवण्यात आलं. 

भारतीय हवाई दलाचं C-17 हे विमान हे विमान मंगळवारी सकाळी काबुलहून रवाना झालं होतं. यामध्ये भारतीय दुतावासातील कर्मचारी, त्या ठिकाणी असणारे सुरक्षा कर्मचारी आणि काही भारतीय पत्रकारांचा समावेश होता. गुजरातमधील जामनगर येथे उतरल्यानंतर या विमानाचं स्वागत करण्यात आलं. अफगाणिस्तानमधून परत आलेल्या लोकांचं फुलांच्या माळा घालून स्वागत करण्यात आलं. तसंच यानंतर बसमध्ये बसल्यावर सर्वांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्या.

बिघडलेली परिस्थिती पाहता काबुल विमानतळावर विमानांचं उड्डाण बंद करण्यात आलं होतं. परंतु अमेरिकन लष्कराद्वारे या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा विमानांची ये-जा सुरू करण्यात आली. यानंतरच भारतीय विमान या ठिकाणाहून उड्डाण घेऊ शकलं. भारतीय हवाई दलाच्या विमानाचे काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये भारतीय नागरिकांना परत आणलं जात असल्याचं दिसत आहे. भारत सरकारद्वारे अफगाणिस्तानसाठी निराळ्या मदत कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

 
याशिवाय अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्नही करण्यात येत आहे. काबुलच्या एका फॅक्टरीमध्ये उत्तर प्रदेशातील अनेक जण अडकल्याची माहिती आहे. त्यांनी भारत सरकारला त्या ठिकाणाहून बाहेर काढण्याची मागणी केली आहे. कंपनीच्या मालकानं त्यांचे पासपोर्टही आपल्याकडे ठेवून घेतल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, गृहमंत्रालयानं व्हिसाच्या नियमांमध्ये काही सूट दिली आहे. अफगाणिस्तानहून भारतात येणाऱ्या लोकांसाठी एक विशेष श्रेणी तयार करण्यात आली आहे. त्यांना व्हिसा घेण्यास कोणतीही अडचण येऊ नये यासाठी ही श्रेणी तयार करण्यात आली आहे.

Web Title: indian airforce Plane carrying 120 Indians from afghanistan Kabul taliban chanted Bharat Mata Ki Jai in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.