भारतीय राजदूताला खलिस्तान्यांचा घेराव, अमेरिकेतील गुरुद्वारा भेटीवेळी गैरवर्तन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 07:18 AM2023-11-28T07:18:49+5:302023-11-28T07:19:15+5:30
अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांना खलिस्तानी आंदोलकांच्या एका गटाने शनिवारी न्यूयॉर्कच्या गुरुद्वारात घेराव घातला; परंतु शीख समुदायाने लगेच त्यांची सुटका केली. संधू हे गुरुनानक जयंतीनिमित्त गुरुद्वारात आले असता हा प्रकार घडला.
न्यूयॉर्क - अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांना खलिस्तानी आंदोलकांच्या एका गटाने शनिवारी न्यूयॉर्कच्या गुरुद्वारात घेराव घातला; परंतु शीख समुदायाने लगेच त्यांची सुटका केली. संधू हे गुरुनानक जयंतीनिमित्त गुरुद्वारात आले असता हा प्रकार घडला.
आंदोलकांनी त्यांच्यावर खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर आणि गुरपतवंत सिंग पन्नू हत्याप्रकरणी विचारणा केली. संधू आणि खलिस्तानी आंदोलकांमध्ये झालेल्या बाचाबाचीचा व्हिडीओ व्हायरल झाला. संधू यांनी एक्सवर पोस्ट करत म्हणाले, लॉन्ग आयलँड येथील गुरुनानक दरबारात गुरुपर्व साजरा करण्याचे सौभाग्य मिळाले. त्यावेळी कीर्तन ऐकत गुरुनानक यांच्या एकता, समानतेसंदर्भातील संदेशावर चर्चाही केली. तसेच सर्वांसाठी आशीर्वादही मागितले.
निज्जर, पन्नू यांच्या हत्येनंतर तणाव
खलिस्तानी दहशतवादी निज्जरची कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियामध्ये गोळ्या झाडून हत्या केली होती. नंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी या हत्येमध्ये भारतीय एजंटांची भूमिका असल्याचा आरोप केल्याने दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला होता.