भारतीय वंशाच्या डॉक्टरला पुरस्कार
By admin | Published: May 9, 2014 11:37 PM2014-05-09T23:37:32+5:302014-05-09T23:37:32+5:30
येथील अनिवासी भारतीय हृदयरोगतज्ज्ञ मितूल कदाकिया यांना वैद्यक क्षेत्रातील राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार घोषित केला आहे.
ह्यूस्टन : येथील अनिवासी भारतीय हृदयरोगतज्ज्ञ मितूल कदाकिया यांना वैद्यक क्षेत्रातील राष्ट्रीय उत्कृष्टता पुरस्कार घोषित केला आहे. अमेरिकी सोसायटी फॉर कार्डियॉव्हेस्कुलर अँजिओग्राफी अँड इंटरवेशन्स फाऊंडेशन या संस्थेने २०१४ चा आपला ग्रेगरी ब्रॅडेन स्मृती पुरस्कार कदाकिया यांना जाहीर केला आहे. हृदयरोग विशेषतज्ज्ञ समूहात मोठ्या प्रतिष्ठेचा असलेल्या या पुरस्कारासाठी दरवर्षी हजारो डॉक्टरांमधून निवड केली जाते. कदाकिया हे सध्या हॉस्पिटल आॅफ दी युनिव्हर्सिटी आॅफ पेन्सिलवेनियात इंटरवेशनल कार्डियॉलॉजीची फेलो म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी हॉर्वर्ड महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले असून हॉर्वर्ड मेडिकल स्कूलमधून वैद्यक पदवी मिळविली.