धक्कादायक! पत्नी अन् २ लहान मुलांसह खतरनाक दरीत ढकलली नवऱ्यानं कार, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 06:20 PM2023-01-31T18:20:46+5:302023-01-31T18:20:59+5:30

जेव्हा बचाव पथक कुटुंबाला वाचवण्यासाठी दरीत उतरले तेव्हा पटेल यांची पत्नी ओरडत असल्याचं ऐकायला आले.

Indian-American man charged in California cliff crash that injured his wife, 2 kids | धक्कादायक! पत्नी अन् २ लहान मुलांसह खतरनाक दरीत ढकलली नवऱ्यानं कार, त्यानंतर...

धक्कादायक! पत्नी अन् २ लहान मुलांसह खतरनाक दरीत ढकलली नवऱ्यानं कार, त्यानंतर...

Next

नवी दिल्ली - अमेरिकेच्या कॅलिफोर्निया इथं मूळचा भारतीय असलेल्या व्यक्तीनं धोकादायक खडकांच्या दरीत ढकलून कुटुंबाला मारण्याचा प्रयत्न केला आहे. कुटुंबासह या व्यक्तीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परंतु ते थोडक्यात वाचले. इतक्या खोल दरीत गाडी कोसळूनही दैव बलवत्तर म्हणून कुटुंब जिवंत बाहेर आले हा एक चमत्कारच असल्याचं बचाव पथकानं म्हटलं. ४१ वर्षीय व्यक्तीवर कुटुंबाच्या हत्येचा प्रयत्न करण्याचा आरोप लावला जात आहे. 

सैन मेटो काऊंटी जिल्ह्याचे अधिकारी स्टीव वागस्टाफ यांनी निवेदनात सांगितले की, ४१ वर्षीय धर्मेश पटेल यांना २ जानेवारीला घडलेल्या दुर्घटनेत गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. २ मुलांचे वडील असलेल्या धर्मेशनं जाणुनबुजून पत्नी आणि मुलांना दरीत ढकलून मारण्याचा प्रयत्न केला त्याचे पुरावेही सापडले आहेत. याठिकाणी असलेल्या काही वाहनचालकांनी धर्मेशनं खोल दरीत गाडी पाडताना पाहिली. काही व्हिडिओ फुटेजही समोर आलेत ज्यामुळे पटेलवरील आरोप निश्चित झालेत. पटेलवर सध्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 

जेव्हा बचाव पथक कुटुंबाला वाचवण्यासाठी दरीत उतरले तेव्हा पटेल यांची पत्नी ओरडत असल्याचं ऐकायला आले. पतीने जाणुनबुजून कार दरीत ढकलली असं ती ओरडत होती. परंतु त्यानंतर पटेलच्या पत्नीने पतीविरोधात बोलण्यास नकार दिला. परंतु जे पुरावे समोर आले त्यावरून पटेल याने कुटुंबाची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं सिद्ध होते असं पोलिसांनी म्हटलं. पटेलला सोमवारी कोर्टात हजर करण्यात येणार होते. पण त्यांच्या वकिलांनी ९ फेब्रुवारीपर्यंत वेळ मागितला. तो कोर्टाने मंजूर केला. 

पटेल साऊथ कॅलिफोर्नियाच्या हॉस्पिटलमध्ये रेडियोलॉजिस्टमधून काम करतो. २ जानेवारीला तो कुटुंबासह सैन फ्रांसिसकोला जात होता. त्याच्यासोबत पत्नी, ७ वर्षाची मुलगी, ४ वर्षाचा मुलगा होता. ही गाडी डेविड स्लाईड इथे जे अत्यंत धोकादायक मानलं जाते तिथे त्यांनी कार दरीत घातली. याठिकाणाहून कुणीही जिवंत परतणं कठीणच आहे. मात्र कुटुंब जिवंत असल्यानं हा चमत्कार घडल्याचं बचाव पथकाने म्हटलं. सध्या पोलीस पटेलनं दरीत कार का घातली या कारणाचा शोध घेत आहेत. ही घटना का झाली? पटेल कुठल्या मानसिक तणावाखाली आहे का? तो केवळ कुटुंबाचा जीव घेऊ इच्छित होता की स्वत:लाही मारायचं होतं हे सगळं चौकशीत पोलीस शोधणार आहेत. 
 

Web Title: Indian-American man charged in California cliff crash that injured his wife, 2 kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.