भारतीय वंशाच्या दक्षिण आफ्रिकी वर्णभेदविरोधी कार्यकर्त्याचे निधन
By admin | Published: March 29, 2017 01:44 AM2017-03-29T01:44:51+5:302017-03-29T01:44:51+5:30
नेल्सन मंडेला यांचे निकटचे सहकारी भारतीय वंशाचे दक्षिण आफ्रिकी वर्णभेदविरोधी कार्यकर्ते अहमद कथराडा यांचे
जोहान्सबर्ग : नेल्सन मंडेला यांचे निकटचे सहकारी भारतीय वंशाचे दक्षिण आफ्रिकी वर्णभेदविरोधी कार्यकर्ते अहमद कथराडा यांचे मंगळवारी येथे रुग्णालयात निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.
‘अहदम यांचे आज सकाळी डोनाल्ड गॉर्डन रुग्णालयात निधन झाले. आफ्रिकन नॅशनल काँग्रेस, बृहद् मुक्ति आंदोलन व द. आफ्रिकेसाठी ही एक मोठी हानी आहे’, असे अहमद कथराडा फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक निशाण बाल्टन यांनी म्हटले. त्यांचा पॅलेस्टिनी संघर्षाला पाठिंबा होता. ते जगाच्या अनेक भागांतील लोकांचे प्रेरणास्रोत होते, असेही त्यांनी सांगितले. मंडेला हे आपले मोठे बंधू असल्याचे ते सांगत. १९६४ च्या कुख्यात रिवोनिया खटल्यात मंडेलांखेरीज ज्या तीन राजकीय कैद्यांना जन्मठेप ठोठाविण्यात
आली त्यात अहमद यांचा समावेश होता. (वृत्तसंस्था)