टॅलेन्ट सर्चमध्ये भारतीय अमेरिकन विद्यार्थ्यांचे वर्चस्व

By admin | Published: March 17, 2016 12:02 AM2016-03-17T00:02:16+5:302016-03-17T00:02:16+5:30

अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत इंटेल सायन्स टॅॅलेन्ट सर्चमध्ये भारतीय अमेरिकन विद्यार्थ्यांनी वर्चस्व राखले आहे. दहा लाख अमेरिकी डॉलरची पुरस्कार रक्कम असणाऱ्या

Indian American students dominate in Talent Search | टॅलेन्ट सर्चमध्ये भारतीय अमेरिकन विद्यार्थ्यांचे वर्चस्व

टॅलेन्ट सर्चमध्ये भारतीय अमेरिकन विद्यार्थ्यांचे वर्चस्व

Next

वॉशिंंग्टन : अमेरिकेतील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत इंटेल सायन्स टॅॅलेन्ट सर्चमध्ये भारतीय अमेरिकन विद्यार्थ्यांनी वर्चस्व राखले आहे. दहा लाख अमेरिकी डॉलरची पुरस्कार रक्कम असणाऱ्या या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
भारतीय अमेरिकी विद्यार्थी अमोल पंजाबी हा ‘फर्स्ट प्लेस मेडल आॅफ डिस्टिंक्शन फॉर बेसिक रिसर्च’मध्ये विजेता ठरला आहे, तर माया वर्मा ‘फर्स्ट प्लेस मेडल आॅफ डिस्टिंक्शन फॉर इनोव्हेशन’मध्ये विजयी ठरली. पेज ब्राऊन याने ‘फर्स्ट प्लेस मेडल आॅफ डिस्टिंक्शन फॉर ग्लोबल गुड’चा पुरस्कार मिळविला.
सोसायटी फॉर सायन्स अ‍ॅण्ड द पब्लिकच्या अध्यक्षा आणि सीईओ माया अजमेरा म्हणाल्या की, भारतीय व अन्य विजेत्या विद्यार्थ्यांनी जगभरातील समस्यांना विज्ञानाच्या मदतीने सोडविण्याचा प्रयत्न केला, तर भविष्यातील समस्यांची उत्तरे शोधण्यात ते अग्रेसर राहिले. मॅसाच्युसेटसच्या अमोल पंजाबी (१७) याने एक असे सॉफ्टवेअर विकसित केले आहे जे औषधी निर्मात्यांना कॅन्सर व हृदयाच्या आजारासाठी नवी चिकित्सा पद्धती विकसित करण्यासाठी मदत करील.

Web Title: Indian American students dominate in Talent Search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.