म्यानमारमध्ये भारतीय लष्करांचे Robo-Dogs पोहोचले मदतीला; भूकंपात दबल्या गेलेल्यांचा घेताहेत शोध
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 16:25 IST2025-04-11T16:23:25+5:302025-04-11T16:25:07+5:30
Myanmar Earthquake Robotic Mules: म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपानंतर भारताने मदतीसाठी लष्कराचे खास रोबोडॉग्स पाठवले आहेत.

म्यानमारमध्ये भारतीय लष्करांचे Robo-Dogs पोहोचले मदतीला; भूकंपात दबल्या गेलेल्यांचा घेताहेत शोध
काही दिवसांपूर्वी झालेल्या प्रलयकारी भूकंपातून म्यानमार सावरू लागला आहे. पण, मदत आणि बचाव कार्य अजूनही सुरू आहे. बहुमजली इमारतीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्यांचा शोध अजूनही सुरू आहे. भारतानेही म्यानमार मदतीचा हात दिला असून, जीवनावश्यक वस्तू आणि औषधी पाठवण्याबरोबरच लष्करी जवानही मदत करत आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
म्यानमारमधील भूकंपग्रस्त भागातील मदतीसाठी भारताने अत्याधुनिक रोबोटिक कुत्रीही पाठवली आहेत. त्यांच्या माध्यमातून मृतांचा शोध घेतला जाणार असून, झालेल्या नुकसानीची पाहणी केली जात आहे.
वाचा >>म्यानमारमधील भूकंप बळींची संख्या १७००वर, एनडीआरएफचे बचावकार्य
भारतीय लष्कराने म्यानमारमधील रोबो डॉग्जचा व्हिडीओ शेअर केला आहे. छोट्या आकाराचे ड्रोन आणि रोबो डॉग्स यांच्या मदतीने पडलेल्या इमारतींच्या नुकसानीची पाहणी केली जात आहे. हे रोबो सीमेवर गस्त घालण्यासाठी तयार करण्यात आलेले असून, आपतीग्रस्त भागात मदत मोहिमेतही त्यांचा वापर केला जात आहे.
VIDEO | Myanmar Earthquake: Indian Army has deployed robotic mules and nano drones to assess damaged buildings in Myanmar. They are conducting technical evaluations and search-and-rescue operations using the modern equipment.#MyanmarEarthquake
— Press Trust of India (@PTI_News) April 11, 2025
(Source: Indian Army) pic.twitter.com/qwOnthTiBh
रोबो कुत्रे काय-काय करतील?
या रोबो कुत्र्यांमध्ये थर्मल कॅमरे आणि इतर विविध प्रकारचे सेंसर लावले आहेत, जे सीमेवर चोख ताळत ठेवू शकतात. या कुत्र्यांना रिमोटद्वारे कंट्रोल केले जाऊ शकते. रस्ते, जंगल, डोंगर... अशा विविध ठिकाणी हे कुत्रे चालू शकतात. विशेष म्हणजे, या रोबो कुत्र्यांमध्ये लहान आकाराची शस्त्रे बसवली जातील, जी गरज पडल्यास शत्रुवर हल्ला करण्यास सक्षम आहे.