‘टाइम’च्या यादीत भारतीय उद्योगपती

By admin | Published: June 10, 2016 04:38 AM2016-06-10T04:38:22+5:302016-06-10T04:38:22+5:30

‘टाइम’ मासिकाच्या सहस्राब्दीच्या दहा जणांच्या यादीत तरुण भारतीय उद्योजक उमेश सचदेव यांचा समावेश करण्यात आला आहे.

Indian businessman in 'Time' list | ‘टाइम’च्या यादीत भारतीय उद्योगपती

‘टाइम’च्या यादीत भारतीय उद्योगपती

Next


न्यूयॉर्क : ‘टाइम’ मासिकाच्या सहस्राब्दीच्या दहा जणांच्या यादीत तरुण भारतीय उद्योजक उमेश सचदेव यांचा समावेश करण्यात आला आहे. ते असा फोन तयार करीत आहेत ज्या माध्यमातून कोणत्याही भाषेत आदान- प्रदान करता येऊ शकते.
‘टाइम’च्या यादीतील या व्यक्ती अशा आहेत ज्या सर्वसामान्य नागरिकांचे जीवन बदलण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ‘टाइम’च्या २०१६ च्या यादीत सचदेव यांचा यासाठीच समावेश करण्यात आला आहे. सचदेव आपले मित्र रवी सरावगी यांच्यासोबत यूनिफोर सॉफ्टवेअर कंपनी चालवीत आहेत. सचदेव यांचा परिचय करून देताना ‘टाइम’ने म्हटले आहे की, चेन्नईची ही व्यक्ती असे सॉफ्टवेअर बनवीत आहे जे नागरिकांना बातचीत करण्यासाठी आणि स्थानिक भाषेत आॅनलाइन बँकिंग सेवेसाठी मदत करील. यूनिफोरचे उत्पादन जगातील २५ पेक्षा अधिक भाषा आणि १५० बोली भाषेत सेवा देऊ शकते. याबाबत बोलताना सचदेव म्हणाले की, या फोनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामानाची माहिती मिळू शकते. (वृत्तसंस्था)

Web Title: Indian businessman in 'Time' list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.